Nashik Contractor Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Government Contractor : नाशिकमध्ये जलजीवन मिशनचे ठेकेदार विवंचनेत

Jal Jeevan Mission Bill : केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी ‘जलजीवन मिशन’अतंर्गत कामाचे बिल थकल्याने सांगलीमध्ये हर्षल पाटील सरकारी ठेकेदाराने आत्महत्या केली.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी ‘जलजीवन मिशन’अतंर्गत कामाचे बिल थकल्याने सांगलीमध्ये हर्षल पाटील सरकारी ठेकेदाराने आत्महत्या केली. हे आत्महत्येचे प्रकरण तसेच जिल्ह्यातही जलजीवन मिशनच्या कामांचे देयके थकल्याने ठेकेदारांनी गुरुवारी (ता.२४) रोजी जिल्हा परिषदेत जोरदार निर्देशने केली.

नाशिकमध्येही आत्महत्या झाल्यानंतर सरकारला जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला. देयके न दिल्यास जिल्ह्यातही ठेकेदारांचे आत्महत्यासत्र होईल, असा इशारा सरकारला देत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ठेकेदारांना शासनाने तत्काळ थकबाकी द्यावी, अशी मागणी केली.

नाशिकमध्ये जलजीवन मिशनमधील पाणीपुरवठा योजनेच्या थकलेल्या देयकांचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. शासनाने तत्काळ कंत्राटदारांची थकबाकी द्यावी अशी मागणी यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ठेकेदार संघटना, जिल्हा ठेकेदार संघटना, सुशिक्षित बेरोजगार संघटना व जिल्हा मजूर फेडरेशन संघटनांनी केली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर एकत्रित आलेल्या ठेकेदारांच्या विविध संघटनांनी हे आंदोलन केले. जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे थकल्याने नैराश्यातून व कर्जबाजीरापणातून ठेकेदाराने आत्महत्या केली, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.भविष्यात जिल्हयातही अशा घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. अनेक ठेकेदारांनी कर्ज काढून योजना पूर्ण केल्या. मात्र,त्यांना बिले मिळत नसल्याचे विनायक माळेकर यांनी सांगितले.

शासनाकडून बिले रखडल्याने कंत्राटदार अडचणीत सापडल्याची भावना बाळासाहेब जाधव, योगेश कासार,निसर्गराज सोनवणे,राजू पानसरे आदींनी मांडली यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनात बी. टी. सांगळे, अजित सकाळे, सागर विंचू, चंद्रशेखर डांगे, जनार्दन सांगळे, मुसा खाटीक, मनोज खाडे, किरण कटाळे, संदीप वाजे, शशिकांत आव्हाड, दिनेश कापसे, संजय भाबड,मनोज नागरे, अतिश पाटील, भूषण कुंवर, मनोहर हांडोरे, नितीन पगारे, ललित जोशी, रंजीत शिंदे, किरण देशमुख, अनिल चौघुले, महेश बच्छाव, विलास निफाडे, अंबादास काळे, गणपत हाडपे, नवनाथ घुगे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ६० हजार हेक्टरवर

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT