Contract Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Contract Farming : मिश्र पीकपध्दत आणि करारशेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

Mixed Cropping : शेतकरी आज करार शेती व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करून अधिक नफा मिळवला पाहिजे, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी दिला.

Team Agrowon

Washim News : शेतकरी आज करार शेती व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करून अधिक नफा मिळवला पाहिजे, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी दिला. क्षेत्रनिहाय तंत्रज्ञानाच्या प्रसारावर सaमाधान व्यक्त करीत कृषी तंत्र प्रशिक्षणातून शेतकऱ्यांच्या क्षमता बांधणीवर भर देण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखीत केले.

देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, वस्त्र उद्योग मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग व प्रसार संस्था यांच्याद्वारे सघन लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.

या पार्श्वभूमीवर वाशीम कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अनुषंगाने मंगळवारी कारंजा येथे गुरुदेव आश्रमत जिल्हास्तरीय कापूस पीक कार्यशाळा झाली. यावेळी श्री. शाह बोलत होते. कापूस हे भारतातील प्रमुख नगदी पीक असून, देशात सुमारे १३० लाख हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड केली जाते. मात्र, उत्पादकतेच्या बाबतीत भारत अद्याप जागतिक स्तरावर मागे आहे.

आधुनिक लागवड पद्धतींचा अवलंब न केल्यामुळे प्रति हेक्टर उत्पादन तुलनेने कमी राहते. त्यामुळे ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कारंजा कृषी उत्पादन बाजार समितीचे माजी सचिव मुंगसाजी काठोये होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शाह आणि केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रविंद्र काळे उपस्थित होते. कार्यशाळेत केव्हीकेचे कृषी विस्तार तज्ज्ञ सुधीर देशमुख , कृषी विद्यातज्ज्ञ व कापूस प्रकल्प नोडल अधिकारी तुषार देशमुख, व्ही.एम. सोळंके, ओमप्रकाश वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तांत्रिक सत्रात तुषार देशमुख यांनी अतिसघन लागवड तंत्रांची सविस्तर माहिती दिली. डॉ. रविंद्र काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्तरावर होत असलेल्या तंत्रज्ञान प्रसाराबद्दल माहिती दिली. श्री. सोळंके आणि रितेश पाडर यांनी अतिघन कापूस लागवड तंत्रज्ञानावर आपले अनुभव मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर देशमुख यांनी केले. आभार अक्षय गिरी यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT