Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Seedling : शिराळा तालुक्यात भाताच्या तरूसाठी दुबार पेरणीची वेळ

Paddy Farming : शिराळाच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आता चिखल करून रोप लावणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, काही ठिकाणी भात तरूचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

Team Agrowon

Sangli News : शिराळाच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आता चिखल करून रोप लावणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, काही ठिकाणी भात तरूचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

काही ठिकाणी तरूसाठी दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे. तर काही शेतकऱ्यांवर तरूसाठी भटकंतीची वेळ आली आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यात भाताच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाजही व्यक्त होवू लागला आहे.

शिराळा तालुक्यात यावर्षी मे महिन्यापासून पावसाने सुरुवात केल्याने यावर्षी प्रथमच धुळवाफ पेरणीची परंपरा खंडित झाली आहे. माळरानावर काही मोजक्याच ठिकाणी १५ टक्क्यांपर्यंत धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्या राहिल्याने पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी आता भाताचे तरू करून रोप लावणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

बैल जोड्या कमी झाल्याने चिखल करण्यासाठी छोट्या रोटरचा सर्रास वापर केला जात आहे. एकाचवेळी लावणीची लगबग सुरू असल्याने मजूर मिळत नाहीत. मजूर मिळत नसल्याने पेरा पैरा पद्धतीने रोप लावण उरकून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागात भात रोपांची लागण केली जाते. त्यासाठी शेतकरी रोपे तयार करतात. मात्र, शिराळा तालुक्यासह पश्चिम भागात संततधार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले. यामुळे भाताची तयार झालेली रोपे कुजून गेली आहेत. त्यामुळे पुन्हा तरू पेरून आता रोप लावण्यासाठी तरू तयार केले जात आहे. यावेळी शेतकऱ्यांची पेरणी कमी होणार असल्याने भात क्षेत्रात घट होणार आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केल्याने धूळवाफ पेरणी करता आली नाही. रोप लावणीसाठी तरू पेरता आले नाही. जून महिन्यात काही तरू पेरले. परंतु, पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचून राहिल्याने तरू कुजून गेले. आता पुन्हा तरूची दुबार पेरणी करून रोप तयार करून पुन्हा रोप लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तरू अभावी रोप लावणीची कामे लांबली आहेत.
- शंकर खोत, शेतकरी, खोतवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management: ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ची सुरुवात

Ahilyanagar Heatwave: अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

Rajura Farmer Issues: राजुरा येथे पाच शेतकऱ्यांनी घेतले विष

Women Empowerment: बचत गटांच्या महिलांची उल्लेखनीय कामगिरी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा ४५ कोटींचा विमा मंजूर

SCROLL FOR NEXT