Paddy Plantation : मुरूडमध्ये आधुनिक पद्धतीने भात लागवड

Paddy Farming : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्या ओळखला जात होता; मात्र कालांतराने औद्योगिकीकरण व लहरी हवामानामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होत गेले.
Paddy Plantation
Paddy Plantation Agrowon
Published on
Updated on

Palghar News : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्या ओळखला जात होता; मात्र कालांतराने औद्योगिकीकरण व लहरी हवामानामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होत गेले. आता येथील शेतकरी आधुनिक पद्धतीने भातलागवडीला पसंती देत आहे.

सध्या एसआरटीअंतर्गत भातशेती केली जात आहे. सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र (एसआरटी) ही एक शाश्वत शेतीची पद्धत आहे. ही पद्धत जमिनीची मशागत न करता आणि पाण्याची बचत करून, तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवते. यामुळे उत्‍पादनात वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

२०२४-२०२५ मध्ये रायगड जिल्ह्यात ७८,७०० हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली आहे. प्रति हेक्टर २,६०० किलो इतकी उत्पादकता नोंदवली गेली असून गेल्या सात ते आठ वर्षांपासून पणन विभागातर्फे भात उत्पादकांना प्रतिक्विंटल २,३८७ हमीभाव मिळत आहे. प्रोत्साहन म्हणून बोनसदेखील प्रति हेक्टरी २० हजार रुपये प्रत्यक्ष खात्यात जमा केला जात आहे.

Paddy Plantation
Paddy Plantation : भातलागवडीच्या क्षेत्रात २४ हेक्टरने वाढ

`एसआरटी’चे फायदे

शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पादन, पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहता येते, त्यामुळे पाण्याची बचत होते. जमिनीची गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे पुढील काळातही चांगले उत्पादन मिळते. नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर होतो, शेतीमधील जोखीम कमी होते.

एकीकडे पावसाने वेळेच्या एक महिना अगोदरच सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांना राब वेळेत टाकता आला नाही; त्यामुळे काही शेतीचे राब कुजून गेले, परंतु त्यानंतर जूनमध्ये पावसाची वेळेवर आणि समाधानकारक हजेरी झाल्याने लावणीने जोर पकडला आहे.

Paddy Plantation
Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

सध्या राब उत्तम प्रकारे आल्याने मागच्या चार-पाच दिवसांपासून भातशेती लावणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. तालुक्यातील कामार्ली विभागात जवळपास मोठ्या प्रमाणावर लावणी झाली.

पेण तालुक्याच्या कामार्ली टप्प्यात भातलावणी जवळपास झाली असून, खारेपाटात राब पुन्हा टाकल्याने या परिसरात आता लावणीला सुरुवात झाली आहे. साधारणपणे १० टक्क्यांवर लावणी गेली आहे. शेतकऱ्यांनी लावणी करताना थोडे अंतर ठेवावे, असे कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले.

पेणमध्ये लावणीला जोर

गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने तालुक्यात भातलावणीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे कामार्ली भागात भातशेतीची लावणी मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर खारेपाटात मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील भातलावणी पाहता जवळपास १० टक्क्यांच्या आसपास गेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com