Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain Update : राज्यात सर्वदूर संततधार पाऊस

Maharashtra Rain News : मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सध्या सर्वदूर संततधार पाऊस बरसत आहे.

राज्यातील १२४ मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. तर सोमवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत पालघरमधील डहाणू, मालयण मंडलांत सर्वाधिक २८९.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांतील धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

पूर्व विदर्भात अतिवृष्टी :

विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत काही मंडलांत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. तर अनेक ओढे, नाल्यातील पाण्याने इशारा पातळी ओलांडली असून शेतात पाणी घुसले आहे.

त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. तर गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ३३ गेट उघडले असून ३.२१ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर नदीकिनारी गावातील नागरिकांनी विशेषतः सतर्कता बाळगावी. तसेच स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला, परमिली नाला), अहेरी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला, आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली- रोमनपल्ली भाग), जारावंडी ते राज्यसीमा भाग असे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद केले आहेत.

कोकणात मुसळधार :

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे. तर खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. तेरेखोल आणि सुख नदी यांनी इशारा पातळी ओलांडली. जिल्ह्यातील काही मार्गांवरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, जिल्ह्याच्या सर्व भागांत सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर दोन दिवस जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली होती.

रत्नागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी कमी झाला आहे. मात्र संगमेश्वर पट्ट्यात संततधार पावसामुळे शास्त्री, खेडमधील जगबुडी, राजापूरमधील अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. धरणांतील पाणी पातळी जवळपास ८० टक्केपर्यंत पोहोचली आहे.

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कामय :

धारावी घाटमाथ्यानंतर कोयना घाटमाथ्यांवर २१० मिलिमीटर पाऊस पडला. तर लोणावळा, शिरागव, वळवण, डुंगरवाडी, दावडी, भिरा, खोपोली या घाटमाथ्यावर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. नगर जिल्ह्यात पावसाची चांगलीच रिपरिप सुरू आहे. त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत आहे.

नाशिक, पुणे, सोलापूर भागातही पावसाच्या सरी कोसळत आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात जोर कायम आहे. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी नोंदवली गेली. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे.

त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येत्या चोवीस तासांत वक्रद्वाराद्वारे पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

खानदेशातही धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत काही भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी (ता. २२) पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी दोन्ही जिल्ह्यांत नद्यांच्या पाण्यांत वाढ कायम होती. अलमट्टीतून दीड लाख क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याने दक्षिण महाराष्ट्राला दिलासा मिळत आहे.

मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी :

मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे. या भागातील जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहे. सध्या ढगाळ वातावरण असले तरी अजूनही जोरदार पावसाची गरज आहे. सध्या तुरळक सरीमुळे पिकांना दिलासा मिळत आहे.

येथे पडला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

मंडल ---- पडलेला पाऊस

डहाणू --- २८९.८,

मालयण --- २८९.८,

असगाव --- २८०

बरवा --- २२६,

चिंचगड --- २१९,

सोमवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटर - (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण : ठाणे, मुंब्रा १६३, अप्पर भिवंडी १०२, पडघा १०५.८, पवयंजे १२३, ओवले १०४, मोराबी १२३, कर्जत, चौक १०२, महाड १०९, बिरवडी १८७, करंजवडी १५१, गोरेगाव, लोणेरे १४४.५, पोलादपूर ११५.८, कोंडवी ११२.८, वाकण ११५.८, म्हसला, खामगाव १०९.८, चिपळूण, खेर्डी १०६, रामपूर ११०.८, वहाळ १२२, सावर्डे १०३, असुर्डे ११७.८, कळकवणे १०४.५, वाकवली ११६, पालगड १४६.५, खेड ११६, आंबवली, कुळवंडी ११०, धामणंद १०६, आबलोली १२२, मंडणगड १०५, रत्नागिरी, खेडशी, फसोप १०५, तरवल १०९.८, कडवी १३०.८, मुरडव १३९.५, माखजन १३०.८, फणसवणे १३०, आंगवली १३२, कोंडगाव १३८, देवळे १०७, देवरुख १२५, तुळसानी १११, तेर्ये १३०, राजापूर ११०, सौंदळ १४८, कोंडये १५७, कुंभवडे ११९, ओणी ११२, पाचल १४२, लांजा १९६, भांबेड १४९, पुनस १३३, विलवडे १५७, आबोली १७७, तळेरे ११७, वैभववाडी १४०, येडगाव ११५, भुईबावडा १०७.८, तळवट १७७.५, भेडशी ११६, साइवन १००, कसा १२७, चिंचणी ११८, बोयसर १२५, तलसरी १५५, झरी १८१, विक्रमगड ९८, तलवड १२७.८.

मध्य महाराष्ट्र : हरसूल, थानापाडा१०१, दहीदेवडी १०५, कार्ला १०८, लोणावळा ९०, वेल्हा १७९, पानशेत ८२, विंझर १०५.५, केळघर ९१.८, करहर ७६.८, पाटण ९३, म्हावशी ८१, हेळवाक १२६, मरळी ८५, मोरगिरी ९२, ढेबेवाडी ८८, तळमावले १४०., कुठरे ८८, कोळे १०८, काले ९५, पसरणी ९६, महाबळेश्‍वर १९०, लामज १५४.५, ताकारी १२५., कासेगाव ९५, बहे १२५, चरण १०४, मलकापूर १२८, आंबा १०७, गगनबावडा १०७.

मराठवाडा : मंथा ५०, घाटनांदूर, बर्दापूर ५३, अहमदपूर ७४, हडोळती ७२, पळशी ५३, जळकोट ५०, जाहूर ५६, हनेगाव ५३.

विदर्भ : चिखलदरा ७६, शिरखेड ७१, कारंजा ९६, कन्नमवरग्राम १०१, ठाणेगाव १९०, केळझर ७०, शिंदी १०९, गिरड ७५, खांढळी ७४, बोरी ७५, सोनगाव १३६, टकलघाट ७५, खाट ७२, कोडामेंडी ७२, बेला ९७, शिर्सी ७६, नंद ७४, भिवापूर १२७, कुही ७०, पवनी १२०, आमगाव १२६, सावर्ला १९२, विरली १५२, लाखंदूर १३३, मासळ १७०, भागडी १३३, सिंधीबिरी ११३, नवेगावबांध १०५, अर्जुनी १००, महागाव , केशोरी, घोटणगाव १६१, सडक अर्जुनी ९९, गांगळवाडी ११६, चौगण ९७, तालोधी ११३, मिढाळा ८४, कुरखेडा १५०, पुराडा १६०, काढोली १२०, माळेवाडा १३८, अरमोरी १३९, देऊळगाव १२५, पिसेवढथा ९५, वैरागड १०५, आलापल्ली ९३, पेरमिली १०५, बेडगाव १००, देसाईगंज ११२, शंकरपूर १४५, मुलचेरा ९४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT