Satara News : सातारा जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, तारळी, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २६) पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गात घट करण्यात आली आहे. कोयना धरणात शुक्रवारी सकाळी आठ वाजता ३२,१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होती. यामुळे कोयना, तारळी, कण्हेर तसेच वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवला होता. मात्र शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना १९८, नवजा १७२ आणि महाबळेश्वर २६७ मिलिमीटर पाऊस झाला होता. यामुळे ७८, ४८७ क्युसेक पाण्याची आवक होत होती. यामुळे गुरुवारी सायंकाळी सात वाजता पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली होती.
पावसाचा जोर कमी येत नसल्यामुळे विसर्ग ४० हजार वाढविण्यात येणार होता. मात्र शुक्रवारी पहाटेपासून पाऊस कमी झाल्याने विसर्गात वाढ रद्द करून सांडव्यावरून ३० हजार व पायथा वीजगृहातून २१०० असे एकूण ३२,१०० क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.
कण्हेर पाणलोट पावसाचा जोर कमी झाल्याने दहा हजार क्युसेक वरून कमी करून एकूण विसर्ग ५५०० क्युसेक करण्यात आला आहे. तारळी धरणातून ५६६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा, कोयना, तारळी, वेण्णा नद्या दुधडी भरूण वाहत आहेत.
जिल्ह्यातील शुक्रवारी सकाळी आठपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये ः कोयना ७६.०६, धोम ७.६५, धोम-बलकवडी ३.०४, कण्हेर ७.८९, उरमोडी ५.८७, तारळी ५.०९.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.