Contaminated Water Supplay Agrowon
ॲग्रो विशेष

Water Contamination : साताऱ्यातील आठ गावांत पिण्याचे पाणी दूषित

Rural Water Quality : जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या तपासणीत आठ गावांमधील पाण्याच्या स्रोतांमधील पाणी दूषित आढळून आले आहे.

Team Agrowon

Satara News : पावसाळ्यात साथीचे आजार उद्‌भवण्‍याची दाट शक्यता असते. या जलजन्य साथीला रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची सातत्याने तपासणी करण्यात येते.

जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या तपासणीत आठ गावांमधील पाण्याच्या स्रोतांमधील पाणी दूषित आढळून आले आहे. या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतींना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील एक हजार ४८४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व संनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत असतो. या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोन वेळा गावोगावच्या पाणी स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येते.

...या घटकांची होते तपासणी

ग्रामस्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करताना सार्वजनिक विहीर, कूपनलिकेच्‍या आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता, क्लोरिन पावडरचे नमुने, जलवाहिनी गळती, व्हॉल्व्‍ह गळती, पाणी टाकी परिसर स्वच्छता यासह अन्य घटकांची तपासणी करून मूल्यांकन केले जाते.

पाणी दूषित असलेली गावे

मायणी, वर्णे, कण्हेरी, कर्णवडी, झगलवाडी, लिंबाचीवाडी, कान्हवडी, मिरजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nagpur Winter Session 2025 : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कामकाजाच्या दिवसांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार

Rabi Crop Insurance: गहू, हरभरा, रब्बी कांद्याचा१५ डिसेंबरपूर्वी काढा विमा

Laurent Simons: लॉरेंट सिमॉन्स: बेल्जियमचा लिटल आइनस्टाइन

Maharashtra Assembly Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशन आजपासून; पिक कर्जमाफी,भ्रष्टाचार आणि मतचोरी हे मुद्दे गाजणार

Farmer Protest: शेतकरी चळवळीला मोठा धक्का, शेतकरी नेते पी. आर. पांडियन यांना १३ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT