Water Testing
Water TestingAgrowon

Akola Water Testing : अकोला जिल्ह्यात जलस्रोत तपासणीची मोहीम सुरू

Rural Water Quality : पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहिमेअंतर्गत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी (एफटीके) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
Published on

Akola News : पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात १२ मे ७ जून या कालावधीत क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे (एफटीके) पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व ५३६ ग्राम पंचायतींमध्ये मोहीम राबवण्यात येत असून त्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला आहे. पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहिमेअंतर्गत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी (एफटीके) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

Water Testing
Water Testing : पाणी गुणवत्ता तपासणी ८७० गावांत होणार

मोहिमेअंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवत्ता विषयक एफटीके प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफटीके किटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे व त्यांच्याकडून शाळा,

Water Testing
Water Testing : अनेक गावे धोक्याच्या उंबरठ्यावर

अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्यूक्यूएमआयएस पोर्टलवर नोंदी घेणे, ग्रामस्थांना रासायनिक व जैविक एफटीके संचाची माहिती देणे, पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे जनजागृती मोहिमेमध्ये सांगितले जाणार आहे.

अशुद्ध पाण्याची होणार ओळख

एफटीके म्हणजे क्षेत्रीय तपासणी संच. हे एक पोर्टेबल उपकरण असते. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते. पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरवणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उद्देश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com