Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Brand : ग्राहकांचा गावपातळीवर दुधाच्या ब्रॅण्डवर विश्वास वाढला

Milk Production : गेल्या काही वर्षांत शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना काळानंतर ग्राहकांचा प्रथिनयुक्त आहाराकडे कल वाढलेला दिसून येतो.

Team Agrowon


अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : गेल्या काही वर्षांत शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना काळानंतर ग्राहकांचा प्रथिनयुक्त आहाराकडे कल वाढलेला दिसून येतो.

त्यामुळे गावपातळीवर असलेल्या दुधाच्या ब्रॅण्डवर ग्राहकांचा विश्वास वाढला आहे, असे मत इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी यांनी व्यक्त केले.

इंडियन डेअरी असोसिएशन, पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि बायफ यांच्या माध्यमातून अद्ययावत व शाश्वत दुग्ध व्यवसाय या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद पुणे कृषी महाविद्यालयाच्या शिरनामे हॉल येथे शुक्रवारी (ता. ५) सुरू झाली, त्या वेळी सोधी बोलत होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बायफचे अध्यक्ष डॉ. बी. के. काकडे, आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय, इंडियन डेअरी असोसिएशनचे चेअरमन डॉ. जे. बी. प्रजापती, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. सी. एस. पाटील, माफसूचे कुलगुरू डॉ. एन. व्ही पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने आदी उपस्थित होते.

सोधी म्हणाले, की वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर दुधाची शाश्वत उत्पादकता आणि गुणवत्ता टिकवणे गरजेचे आहे. पूर्वी देशात दुधाचे उत्पादन कमी होते. परंतु दर २५ वर्षांनी दुधाच्या उत्पादनात वाढ होत गेलेली दिसून येते. येत्या काळात ही उत्पादकता वाढणार आहे.

त्यामागे ग्राहकांना मिळणारी दुधाची गुणवत्ता आणि शेतकऱ्यांना मिळणारा बऱ्यापैकी दर यामुळे ही वाढ झालेली आहे. भविष्यात शाश्वततेच्यादृष्टीने शेतकरी आणि ग्राहक हे दोघेही समाधानी राहिले तरच दुधाची शाश्वतता टिकून राहील. यात प्रामुख्याने गुणवत्ता, नैसर्गिक पोषक मूलद्रव्ये, ग्राहकांना मिळणारा दर हे महत्वाचे आहे.

कुलगुरू डॉ. पाटील यांनी कृषी विद्यापीठाच्या देशी गोवंश व प्रशिक्षण केंद्राबाबत माहिती दिली. इंडियन डेअरी असोसिएशनच्या सदस्य रिची अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. देशी गाई संशोधन व प्रशिक्षणाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rainfall Deficit: लांबलेल्या मॉन्सूनमुळे राज्यावर दुष्काळाचे सावट: मुख्यमंत्री

Onion Prices: कांद्याला दोन हजारांच्या पुढे दर; अहिल्यानगर बाजारात दर तेजीत

Turmeric Export: जानेफळच्या हळदीची दुबईत झेप; बुलडाण्यातून पहिला निर्यात कंटेनर रवाना

Maharashtra Monsoon Session: अधिवेशनात कर्जमाफी, पीकविमा मुद्दे गाजणार

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT