Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : जलसमृद्धीसाठी नैसर्गिक झऱ्यांचे संवर्धन

Natural Water Resources : दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट शहर व ग्रामीण भागामध्ये उभे ठाकले आहेत.

Team Agrowon

Raigad News : नैसर्गिक पाणीसाठे मर्यादित स्वरूपात राहिले असून, पाणीसाठ्यांचे जतन व संवर्धन करणे भविष्यातील गरज बनू लागली आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे ही गरज ओळखून महाड तालुक्यातील नाते येथील ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ‘झरे विकास कार्यक्रम’ हाती घेण्यात आला आहे. यातूनच डोंगर-दऱ्यातून वाहणाऱ्या झऱ्यांचे जतन करत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट शहर व ग्रामीण भागामध्ये उभे ठाकले आहेत. मोठमोठ्या नळ पाणी योजना आहेत, परंतु नदी-नाल्यात पाण्याचा थेंब नाही, अशी स्थिती अनेक गावांमध्ये निर्माण झाली आहे.

पाण्याचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक असून, पाण्याचे जतन व नियोजनासाठी सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. हिरवळ संस्थेचे अध्यक्ष जलनायक किशोर धारिया यांच्या पुढाकाराने, नाते ग्रामस्थ व श्री. राजेंद्र सामाजिक विकास संस्था यांनी नैसर्गिक झरे संवर्धनासाठी पावले उचलली.

मोखाडातील स्वराज फाउंडेशन व टाटा कॅपिटल व पुणे येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या सहकार्याने नाते गावात झरे विकास कार्यक्रम यशस्वी राबवला आहे. डोंगरातून येणाऱ्या गिमोने नावाच्या झऱ्याचे पाणी जतनासाठी ग्रामस्थ व या संस्थांनी संयुक्त प्रयत्न सुरू केले. झऱ्यांच्या भोवताली शास्त्रोक्त बांधकाम केले आहे. आता पाणी हौदात साठवून पाणी योजनेच्या टाकीत सोडण्यात येत आहे.

वणवा रोखण्यासाठी काम

नाते गावातच वन व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्यातून वणवा रोखण्याचे काम १० वर्षांपासून सुरू असून, जंगलतोडही थांबवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील जमिनीची धूप थांबली असून, भूजल पातळी आणि झऱ्यांनाही पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. अनेक गावांमध्ये डोंगर-दऱ्यातून वाहणारे भरपूर नैसर्गिक झरे आहेत, परंतु त्याच्या संवर्धनाकडे लक्ष दिले जात नाही, अशा झऱ्यांचे संवर्धन केल्‍यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.

झरे विकास कार्यक्रम काळाची गरज आहे. नाते गावाचा आदर्श घेऊन नाते परिसरातील अनेक गावे आता यासाठी पुढाकार घेत आहेत.
- गणेश खातू, अध्यक्ष, श्री. राजेंद्र सामाजिक विकास संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यात हुडहुडी कायम राहणार; राज्यातील बहुतांशी भागात तापमानात मोठी घट

Pulse Cultivation: रायगडमध्ये कडधान्य लागवड अडचणीत

Soybean Procurement: सोयाबीन, उडीद विक्रीसाठी सांगलीत २०० शेतकऱ्यांची नोंदणी

Maharashtra Politics: 'उदय सामंत कोणत्याही क्षणी जवळचा गट घेऊन भाजपसोबत जातील'; अंधारेंच्या दाव्यानं खळबळ, नेमकं खरं काय?

Crop Management: कारल्यामध्ये पीक संरक्षण, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT