Nanded Water Conservation : नांदेडला सहा लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट

Slit-Free Dam : जिल्ह्यात या वर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत ५३ तलावातून गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात या वर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत ५३ तलावातून गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भातील माहितीसाठी संबंधितानी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजीव भोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एस. कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, तंत्र अधिकारी के. एम. जाधव, कार्यकारी अभियंता पाटबंधारे आ. शी. चौघुले, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि. प.) अशोक भोजराज आदींची उपस्थिती होती.

Water Conservation
Galmukt Dharan Galyukta Shiwar Scheme : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना कायमस्वरूपी राबविणार

राज्य शासनाने दिलेल्या कृती आराखड्यानुसार १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यात एक लाख ५२ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या वर्षात ५३ प्रकल्पांतून पाच लाख ८० हजार ७२१ घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशन, टाटा मोटार्स, भारतीय जैन संघटना तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना यंत्रसामग्री आणि इंधनाचा खर्च देणे प्रस्तावित आहे.

Water Conservation
Galmukt Abhiyan : दुष्काळावर मात करण्यासाठी बुलडाण्यात गाळमुक्त मोहीम

तसेच अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल यासाठी अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्र सामग्री आणि इंधनासाठी ३१ रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी ३५.७५ प्रति घनमीटर प्रमाणे १५ हजारच्या मर्यादा व २.५ एकरासाठी ३७ हजार ५०० रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

...यांना करा संपर्क

जिल्ह्यातील ५३ तलाव वगळता इतर तलावातील गाळ काढण्यासाठी तालुकानिहाय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. मृद्‍ व जलसंधारण विभागाच्या नांदेड विभागात नांदेड, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यासाठी आर. वाय. मुरमुरे, मुखेड तालुक्यासाठी एच. जी. कानडे, नायगाव विभागात नायगाव, धर्माबाद, उमरी तालुक्यासाठी बी.एस.मोरे, भोकर विभागात भोकर, मुदखेड, अर्धापूर तालुक्यासाठी डी. डी. गायकवाड, कंधार विभागात कंधार व लोहा तालुक्यासाठी यू. डी. गायकवाड, किनवट विभागात किनवट व माहूर तालुक्यासाठी डी. ए. गडदे आणि देगलूर विभागात देगलूर व बिलोली तालुक्यासाठी टी. ए. मुरुमकर यांच्याशी संपर्क करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com