Narendra Modi Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Narendra Modi : काँग्रेसने गरिबांना लुटले ः मोदी

Maharashtra Assembly Election : काँग्रेसने नेहमी गरिबांना पुन्हा गरिबीत लोटले आहे. गरिबी हटावच्या नावाखाली गरिबांना लुटले आहे.

Team Agrowon

Mumbai News : काँग्रेसने नेहमी गरिबांना पुन्हा गरिबीत लोटले आहे. गरिबी हटावच्या नावाखाली गरिबांना लुटले आहे. अन्न, निवारा आणि कपड्यांसाठी ७० वर्षे झुंजावे लागले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील सभेत केली. या वेळी ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्याचा पुनरुच्चार करत काँग्रेस घुसखोरांचे समर्थन करते, असा आरोपही केला.

खारघर येथील सेंट्रल पार्क येथे झालेल्या सभेत मोदी यांनी काँगेसवर चौफेर टीका केली. तसेच महायुती सरकारच योजना सत्यात आणून नागरिकांचे जीवन सुकर बनवू शकते, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘भाजप महायुती आहे तर महाराष्ट्राची प्रगती आहे. विकसित भारताच्या स्वप्नात सुराजच्या संकल्पाला पुढे नेण्याचे आमचे ध्येय आहे. जेव्हा गरीब पुढे येईल, तेव्हाच सुराज्यचे स्वप्न साकार होईल आणि हे केवळ भाजप आणि महायुती सरकारच करू शकते. काँग्रेसने नेहमीच गरिबाला गरीबच ठेवण्याच्या अजेंड्यावर काम केले. पिढ्यान्‌ पिढ्या या लोकांनी केवळ गरिबी हटावची खोटी घोषणा दिली.

गरिबी हटावच्या नावावर काँग्रेसने गरिबांना लुटले. त्यामुळे गरिबीतून कुणीच बाहेर आले नाही. अन्न, निवारा आणि कपड्यासाठी देशातील जनता ७० वर्षे झुंजली. मागील १० वर्षांत पहिल्यांना ही परिस्थिती बदलली आहे. २५ कोटी जनतेला आम्ही गरिबीतून बाहेर काढले. ४ कोटी बेघर लोकांना पहिल्यांदा पक्क्या घराची सुरक्षा दिली. १२ कोटी जनतेच्या घरात शौचालय तयार केले आणि सन्मानाने जगू दिले.

जलजीवन मिशनमधून १२ कोटी घरांपर्यंत पाइपने पाणी पोहोचवले. प्रत्येक घरातील व्यक्तीचे बँक खाते आहे. आता मजूरसुद्धा यूपीआयमधून पेमेंट करत आहे. गरीब प्रगती करत आहे. देशाची प्रगती होत आहे.

या योजनांचा सगळ्यात मोठा लाभार्थी दलित, आदिवासी, मागासवर्गीय, वंचित समुदायाचे लोक आहे, महायुती सरकारची धोरणे शोषित आणि वंचितांची ताकद बनत आहे. जे काम १० वर्षांत झाले.

आधीही होऊ शकले असते. पण काँग्रेसच्या लोकांची मानसिकताच नव्हती. गरिबांना हक्कच द्यायचा नव्हता. आजही काँग्रेस प्रत्येक गरिबाच्या कल्याणकारी असेल, मध्यमवर्गीयांच्या आनंदाची योजना असो त्याला विरोध करत आहे.

देशातील ८० कोटी जनतेला प्रत्येक महिन्याला मोफत रेशन पोहोचवत आहोत. रायगडमध्ये १८ लाख लोकांना मोफत रेशन देत आहे. आता यावर कुणाचा आक्षेप आहे का सांगा? पण काँग्रेसला आक्षेप आहे. २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेत त्यांना रेशन का दिले जाते, असा सवाल केला जात आहे. या लोकांचा खर्च वाढून ते गरिबीत जावेत, असे त्यांना वाटते. महाविकास आघाडीला संधी मिळाली तर तेच करणार आहेत.’

‘घुसखोरांची काँग्रेसला काळजी’

झारखंडमधील प्रचाराचा दाखला देत श्री. मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या एका नेत्याने झारखंडमध्ये घोषणा केली आहे, की आम्ही हिंदू, मुसलमानांबरोबर बांगलादेशी रोहिंग्यांनाही स्वस्त गॅस सिलिंडर देऊ. घुसखोरांची आरती करणाऱ्या लोकांना देशात कुठे संधी मिळाली पाहिजे का? खुलेआम यांचा नेता घोषणा करतो.

केवळ मतांसाठी मुलाच्या उज्ज्वल भविष्याशी कसे खेळतात याचे हे उदाहरण आहे. काँग्रेस मतांचे राजकारण करत आहे. ते गरिबांचे दुष्मन आहेत. त्यामुळे यांना रोखण्याची जबाबदारी गरिबांची आहे. महाराष्ट्राचा विकास ही आमची प्राथमिकता आहे. मागील सरकारने अनेक कामांना ब्रेक लावला होता.

जे मुश्‍कील वाटत होते ते आम्ही प्रत्यक्षात आणून दाखवले. अटल सेतू, २० हजार कोटींचा नवी मुंबई विमानतळ, ८० हजार कोटींचे वाढवण बंदर, समृद्धी, पनवेल कर्जतच्या दुहेरीकणराचे काम यातून संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलून जाईल. रायगड विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे. पीएम मत्स्यसंपदा योजेनतून मच्छीमारांना हजारो कोटी रुपये दिले आहेत. मच्छीमारांना पीएम किसान क्रेडिट कार्ड्‌सद्वारे जोडले आहे. ४५० कोटींच्या गुंतवणुकीतून तीन नवी बंदरे बनवली जात आहेत. मच्छीमारांचे यातून उत्पन्न वाढेल.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT