Maharashtra Government Schemes : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहिण, अन्नपूर्णा योजना, गुलाबी रिक्षा, तिर्थाटन योजना आनंदाचा शिधा, या योजनाचा साधा उल्लेख अर्थसंकल्पात नाही. या योजना बंद होणार का? याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावे. महायुतीचे सरकार आले पण एकनाथ शिंदे यांच्याच योजना बंद करण्यात आल्या, म्हणजे योजना आणून एकनाथ शिंदे यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला कारण मुख्यमंत्री पद त्यांना मिळाले नाही. असा मिश्किल टिप्पणी विजय वडेट्टीवर यांनी मंगळवार (ता.११) विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होती. या चर्चेत वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.
यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, "महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी अनेक घोषणा केल्या. त्याचे निर्णय पहिल्या कॅबिनेट मध्ये अपेक्षित होते नाहीतर पहिल्या बजेटमध्ये योजना आणल्या पाहिजे होत्या. पण महायुतीचे घोषणापत्र आणि अर्थसंकल्पात तफावत आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही अस अर्थमंत्री अजित पवार म्हणाले त्याचवेळी महाराष्ट्र आता कर्जाच्या खाईत घालवल्याशिवाय महायुती सरकार थांबणार नाही असे चित्र आहे". अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
"महाराष्ट्र राज्यावर ८ लाख ३९ हजार २७५ कोटी कर्जाचा डोंगर झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यावर ५ लाख ७६ हजार कोटी कर्ज होते. तीन वर्षात ४५ टक्के कर्जात वाढ झाली." असेही वडेट्टीवार म्हणाले.
अजित दादा हीच तुमची आर्थिक शिस्त का?
"निवडणुकीत महायुतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. अजित पवार म्हणाले शेतकरी कर्जमाफी बाबत बोललो नाही, पण त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीरनामा वाचन करताना शेतकरी कर्जमाफी करू असे म्हणाले होते.त्यामुळे ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे, आता या जबाबदारी पासून सरकारने हात झटकू नये."
"राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात उद्योग क्षेत्राचा विकास दर ६.२ टक्क्यावरून ४.९ टक्के होण्याचा अंदाज आहे. राज्यात २०२२ मध्ये बेरोजगारांची संख्या ५८ लाख ७८ हजार होती, २०२३ मध्ये ६२ लाख ७८ हजार झाली तर २०२४ तर २०२४ मध्ये बरोजगारांची संख्या ७० लाख ६३ हजारपर्यंत वाढली. मग दावोस मध्ये जाऊन इतकी गुंतवणूक आली, रोजगार निर्माण होणार हा जुमला आहे का?" असा प्रश्न वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.