Congress On Mahayuti Agrowon
ॲग्रो विशेष

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Maharashtra Assembly Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यावरून काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : शनिवारी (ता.२४) राज्यातील विधानसभेचा निकाल लागला. यावेळी राज्यातील जनतेनं महायुतीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता सोमवारी (ता.२५) किंवा मंगळवारी (ता.२६) नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यादरम्यान लागलेल्या निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. हा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्विकार्य असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. तसेच राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने महायुतीने पाळावीत, असे आवाहन केले आहे. ते मुंबईत टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर प्रभारी चेन्नीथला यांनी प्रमुख लोक, काँग्रेस व मविआचे नेते, पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला. यावेळी हा निकाल अपेक्षित नव्हता असाच सुर राज्यभर निघत असून एक्झिट पोलमध्येही भाजप युती व महाविकास आघाडी यांच्यात काटें की टक्कर दिसली होती.

चेन्नीथला म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले आणि अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल, असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर दौरे केले, लोकांशी संवाद साधला, पूर्ण तयारीनिशी निवडणुका लढल्या. राज्यात शेतकऱ्यांपुढे गंभीर समस्या आहेत, महागाई, बेरोजगारी, सरकारचा भ्रष्टाचार, असे मुद्दे असताना केवळ लाडकी बहिण या मुद्द्यावरून एवढा मोठा निकाल कसा लागू शकतो? जनतेचाही या निकालावर विश्वास बसलेला नाही, असे चेन्नीथला म्हणाले.

या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आठव्यांदा अत्यंत कमी मताने विजया झाला. राज्यातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी आपण घेत असून जनतेच्या प्रश्नासाठी व लोकशाहीच्या बचावासाठी आम्ही अधिक जोमाने काम करत राहू चेन्नीथला म्हणाले.

यावेळी नाना पटोले म्हणाले की, विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून वरिष्ठ पातळीवर या निकालाचे विश्लेषण केले जाईल. परंतु नव्या सरकारने जनतेल्या दिलेली लाडकी बहिण योजना सुरु ठेवावी, शेतकरी कर्जमाफी, शेतीला २४ तास वीज पुरवठा, सोयाबीनला ६ हजार, कापसाला ९ हजार तर धानाला १ हजार रुपये बोनस द्यावा. एमएसपीपेक्षा कमी भाव मिळाला तर फरकाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. तरुणांना नोकऱ्या, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या आश्वासवाची पूर्तता महायुतीने करावी.

तसेच महाराष्ट्राची संपत्ती विकण्याचे थांबवून राज्याची तिजोरी भर घालावी, असे पटोले यांनी सांगताना, निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या सभांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांच्या सभांना जनतेचा प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे आलेला हा निकाल अनपेक्षित वाटत असून आम्ही पराभवाचे चिंतन करू असेही नाना पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT