Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Vidhansabha Election Result Update : खानदेशात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अक्षरशः पानिपत झाले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले असून, महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी आपापले गड राखले आहेत.
Jalgaon Assembly Election Result
Jalgaon Assembly Election ResultAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अक्षरशः पानिपत झाले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले असून, महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी आपापले गड राखले आहेत.

सलग दोन-तीन व त्यापेक्षा अधिक वेळेस निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यात धुळे ग्रामीणमधून कुणाल रोहिदास पाटील यांचा भाजपचे राम भदाणे यांनी पराभव केला आहे. मोदी लाटेतही कुणाल पाटील यांनी निकराचा लढा देत आपली जागा राखली होती. नंदुरबारमध्ये काँग्रेसने आपली अक्कलकुवा-धडगाव ही पारंपरिक जागा गमावली आहे.

या मतदार संघातून सलग सात वेळेस निवडून आलेले अॅड. के. सी. पाडवी यांचा पराभव झाला आहे. पाडवी यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी हे नंदुरबारमध्ये काँग्रेसचे खासदार आहेत. तर नवापूरमध्ये काँग्रेसचे शिरीष नाईक यांनाही मोठा संघर्ष करून पुन्हा आमदारकी मिळाली आहे. रावेरमध्येही काँग्रेसचा पराभव झाला असून, भाजपचे नेत स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांनी रावेरमध्ये आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरींना धूळ चारली आहे.

Jalgaon Assembly Election Result
Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

गावीत, खडसेंची कन्या दुसऱ्यांदा पराभूत

जळगावातील मुक्ताईनगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांचा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. मागील वेळेसही पाटील व रोहिणी खडसे यांच्यात सामना झाला होता.

नंदुरबारमध्ये भाजप नेते विजयकुमार गावीत यांचे बंधू राजेंद्र गावीत, भरत गावीत व कन्या हिना गावीत यादेखील निवडणूक लढवित होत्या. राजेंद्र गावीत हे शहादा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार होते. भरत गावीत हे नवापूरमध्ये अपक्ष म्हणून लढले. तसेच कन्या डॉ. हिना या अक्कलकुवामध्ये अपक्ष म्हणून नशीब आजमावत होत्या. परंतु राजेंद्र व भरत गावीत व आणि डॉ. हिना यांचाही पराभव झाला. डॉ. हिना या लोकसभा निवडणुकीत नंदुरबारमधून भाजपच्या उमेदवार होत्या. त्यात त्या पराभूत झाल्या.

जिल्हानिहाय विजयी आणि पराभूत उमेदवार

जळगाव जिल्हा : जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील (एकनाथ शिंदे गट, विजयी), गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, पराभूत). जळगाव शहर - सुरेश भोळे (भाजप, विजयी), जयश्री महाजन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, पराभूत), चाळीसगाव - मंगेश चव्हाण (भाजप, विजयी),

Jalgaon Assembly Election Result
Assembly Election Result : ‘मोदी फॅक्टर’ पुढे राहुल यांची ‘जादू फिकी’

उन्मेष पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, पराभूत), एरंडोल - अमोल पाटील (एकनाथ शिंदे गट, विजयी), डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, पराभूत), भगवान पाटील (महाजन) (अपक्ष, पराभूत). अमळनेर - अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, विजयी), अनिल शिंदे (काँग्रेस, पराभूत), शिरीष चौधरी (अपक्ष, पराभूत). रावेर - अमोल जावळे (भाजप, विजयी),

धनंजय चौधरी (काँग्रेस, पराभूत), मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील (एकनाथ शिंदे गट, विजयी), रोहिणी खडसे खेवलकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, पराभूत), जामनेर - गिरीश महाजन (भाजप, विजयी), दिलीप खोडपे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, पराभूत), चोपडा - चंद्रकांत सोनवणे (एकनाथ शिंदे गट, विजयी),

प्रभाकर सोनवणे (शिसवेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, पराभूत), भुसावळ - संजय सावकारे (भाजप, विजयी), राजेश मानवतकर (काँग्रेस, पराभूत), पाचोरा - किशोर पाटील (एकनाथ शिंदे गट, विजयी), अमोल शिंदे (अपक्ष, पराभूत), वैशाली सूर्यवंशी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, पराभूत)

नंदुरबार जिल्हा : नंदुरबार - विजयकुमार गावीत (भाजप, विजयी), किरण तडवी (काँग्रेस, पराभूत). नवापूर - शिरीष नाईक (काँग्रेस, विजयी), शरद गावीत (अपक्ष, पराभूत), भरत गावीत (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, पराभूत). शहादा - राजेश पाडवी (भाजप, विजयी), राजेंद्र गावीत (काँग्रेस, पराभूत), अक्कलकुवा - आमशा पाडवी (एकनाथ शिंदे गट, विजयी), के. सी. पाडवी (काँग्रेस, पराभूत), डॉ. हिना गावीत (अपक्ष),

धुळे जिल्हा : धुळे ग्रामीण - राम भदाणे (भाजप, विजयी), कुणाल पाटील (काँग्रेस, पराभूत). शिरपूर - काशीराम पावरा (भाजप, विजयी), जितेंद्र ठाकूर (अपक्ष, पराभूत), बुधा पावरा (सीपीआय, पराभूत). शिंदखेडा - जयकुमार रावल (भाजप, विजयी), संदीप बेडसे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, पराभूत), साक्री - मंजुळा गावीत (शिवसेना एकनाथ शिंदे गट, विजयी), प्रवीण चौरे (काँग्रेस, पराभूत). धुळे शहर - अनुप अग्रवाल (भाजप, विजयी), अनिल गोटे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, पराभूत).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com