Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Winner Candidate List of NCP Sharadchandra Pawar : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. यात महाविकास आघाडीची पुर्ण पिच्छेहाट झाली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर मात केली आहे. २८८ जागांपैकी २३० जागांवर महायुतीला घवघवीत यश मिळाले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यंदा मोठा फटका बसला असून ८६ जागांपैकी फक्त १० ठिकाणीच यश मिळवता आले आहे. पण त्यांनी राज्याला सर्वात कमी वयाचा आमदार दिला आहे. हा आमदार दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील ठरले आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील तिनही पक्षांची धुळदान झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिसेनेला २०, काँग्रेसला १६ जागा राखता आल्या आहेत.

Sharad Pawar
Maharashtra Election 2024 : मोदी साहेब! शेतकऱ्यांनी साथ दिली, आता शब्द पाळा; कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजार हमीभाव आणि भावांतरची तातडीने अंमलबजावणी करा

तासगाव- कवठेमहांकाळ विधासभा मतदारसंघातून शरद पवार यांनी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांनी रोहित पाटील यांच्या मागे ताकद उभी केली. यातून अवघ्या वयाच्या २५ वर्षी ते सर्वात कमी वयात आमदार झाले आहेत.

माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत रोहित पाटील यांच्या समोर आव्हान उभे केले होते. मात्र रोहित पाटील यांनी संजयकाका यांचा २७ हजार ६४४ मतांनी पराभव केला. रोहित १५ व्या विधानसभेच्या सभागृहातील सर्वात तरुण आमदार ठरले असून महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात तरूण आमदार म्हणून रोहित पाटील यांची नोंद झाली आहे.

Sharad Pawar
Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

शरद पवार यांना केवळ १० जागांवर यश

दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात तुतारी फुंकली होती. त्यांनी ८६ मतदारसंघात उमेदवार उभारत ४० मतदारसंघात अजित पवार यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. शरद पवार यांनी स्वतः प्रचारात उतरून वातावरण निर्मिती केली होती. महायुतीच्या धोरणांवर टीका करत अजित पवार गटाला लक्ष केले होते. मात्र प्रत्यक्ष निकालात शरद पवारांना मोठा फटका बसला आहे. ८६ पैकी केवळ १० जागांवर शरद पवारांचे उमेदवारांचा विजय झाले आहेत.

अजित पवार गटाची सरशी

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडीला यश मिळेल, असे वातावरण तयार झाले होते. पण दोन दिवसांपूर्वीच एक्झिट पोलमधून सत्ता महायुतीकडे जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या अंदाजाप्रमाणेच निकाल लागला आहे. पण शरह पवार यांच्यासह मविआच्या मित्र पक्षांच्या पदरी अपयश आले. ४० ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीविरोधात उभे केलेल्या जागांवर तब्बल ३० ठिकाणी अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. तर ७ जागांवर शरद पवार गटाला यश मिळाले आहे. इतर आणखी तीन मतदारसंघात शरद पवार यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Sharad Pawar
Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

शरद पवार गटाचे विजय उमेदवार

इस्लामपूर - जयंत पाटील,

मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड,

कर्जत जामखेड - रोहित पवार

वडगाव शेरी बापूसाहेब पठारे

शरद पवार गटाचे विजय उमेदवार

करमाळा - नारायण पाटील

तासगाव - कवठे महांकाळ - रोहित पाटील

बीड - संदीप क्षीरसागर

माळशिरस - उत्तमराव जानकर

माढा - अभिजीत पाटील

मोहोळ - राजू खरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com