Bharat Krushak Samaj  Agrowon
ॲग्रो विशेष

Universal Land Survey: शेताची सार्वत्रिक मोजणी मोहीम राबवा

Bharat Krushak Samaj: सर्व भागांत सार्वत्रिक शेतमोजणी मोहीम राबवून प्रत्येत शेतकऱ्याचे क्षेत्र मोजून हद्द, खुणा कायम करून हे वाद कायमचे दूर करावेत, अशी मागणी भारत कृषक समाजाने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News: अनेक शेतकऱ्यांत बांध, रस्ते यावरून वाद आहेत. यात शासनाने विविध निर्णय बांध, रस्त्याचे वाद दूर करण्यासाठी घेतले आहेत. परंतु शासनाने हे वाद कायमचे दूर करण्यासाठी सर्व भागांत सार्वत्रिक शेतमोजणी मोहीम राबवून प्रत्येत शेतकऱ्याचे क्षेत्र मोजून हद्द, खुणा कायम करून हे वाद कायमचे दूर करावेत, अशी मागणी भारत कृषक समाजाने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

विविध मागण्यांचे निवेदन याबाबत महसूलमंत्री यांना देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की शेतजमीन मोजणी २०० रुपयांत, शेत पाणंद रस्ते, शेतरस्ते आदी किमान १२ फुटांचे असणे, सात-बारा उताऱ्यावर रस्त्याची नोंद आदी चांगले निर्णय शासनाने घेतले आहेत. परंतु राज्यात किंवा कुठेही एकाच वेळी सार्वत्रिक शेतमोजणी झालेली नाही.

सर्व शेतकऱ्यांची एकाच वेळी सार्वत्रिक शेतमोजणी करायला हवी. कारण शेतात वाद खुणा नसल्याने, हद्द कायम नसल्याने होतात. बांध, शेतरस्ते, सात-बारा उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे, त्यापेक्षा आपली शेती कमी असणे यामुळे वाद होता.

या स्थितीत हे वाद दूर करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचे क्षेत्र मोजून त्यांच्या खुणा, हद्द कायम करायला हवी. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या सात-बारा उताऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे, तेवढे प्रत्यक्षात मिळायला हवे. कारण अनेकांचे क्षेत्र सातबारा उताऱ्यावरील नोंदीपेक्षा मोजणीत कमी दिसते. तर काहींचे क्षेत्र सातबारा उताऱ्यावरील नोंदीपेक्षा अधिक दिसते. यामुळे बांध, रस्त्याचे वाद होतात.

ही मोजणी शासनाने करावी. मोजणी करून शासनानेच हद्द, खुणा कायम करून खुणा, निशाण तयार करावेत. त्याबाबत महसूल यंत्रणा, भूमी अभिलेख आदी विभागांना निर्देश दिले जावेत, अशी मागणी कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर, डॉ.रमेश ठाकरे, प्रशांत तुरक, राजेंद्र गावंडे आदींनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tanker Water Supply: पुरंदरमधील १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा

NCP Party Discipline: पक्षातील अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Pune APMC: भुसार बाजारातील वापर शुल्क वसुलीला स्थगिती

Foodgrain Eligibility Issue: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांचे ‘रेशन’ बंद?

KVK Ganeshkhind Nursery: गणेशखिंड कृषी संशोधन केंद्रात कलमे, रोपे विक्रीसाठी उपलब्ध

SCROLL FOR NEXT