Trader Protest: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार मालावर लागू केलेल्या वापर शुल्क वसुलीला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. दि पूना मर्चंट्स चेंबर आणि महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने या शुल्कवाढीला विरोध दर्शविल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला..व्यापारी संघटना आणि बाजार समितीच्या प्रतिनिधींची बाजू ऐकून घेतल्यानंतर पणनमंत्री रावल यांनी वापर शुल्क आकारणी निर्णयाला स्थगिती दिली. तसेच या विषयावर तोडगा काढण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्या..Pune APMC: भुसार वस्तूंवरील शुल्कामुळे महागाईत भर पडणार .या समितीत पणन संचालक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांच्यासह दि पूना मर्चंट्स चेंबरचे चारप्रतिनिधी असतील. समिती पुढील १५दिवसांत बैठक घेऊन आपला अहवाल आणि शिफारशी सरकारकडे सादर करणारआहे..Pune APMC: पुणे बाजार समितीत भुसार मालावर ‘वापर शुल्क’ आकारले जाणार.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रलंबित विषयांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत पणन संचालक, मुंबई बाजार समितीचे सहसचिव आणि सहा व्यापारी प्रतिनिधींचा समावेश असेल..मुंबई आणि पुणे वगळता राज्यातील इतर बाजार समित्यांच्या प्रश्नांसाठी आणखी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत पणन संचालकांसह महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांनी सुचविलेले सात सदस्य व बाजार समिती विषयतील तज्ज्ञ सदस्य असतील..बैठकीला पणन संचालक शरद जरे, पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, सचिव राजाराम धोंडकर, व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया, दि पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, माजी अध्यक्ष रायकुमार, नहार कॅटचे अध्यक्ष मोहन गुरनानी, चेअरमन दीपेन अग्रवाल, ग्रोमाचे अध्यक्ष भीमजी भानुशाली, उपाध्यक्ष अमृत जैन, फामचे (फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र) अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.