
Pune News : राज्यात भूमिअभिलेख विभागाच्या अंतर्गत असलेल्या सहा महसुली विभागांत प्रलंबित असलेल्या ८८ हजार मोजणी प्रकरणापैकी आतापर्यंत सुमारे ६३ हजार मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर सध्या केवळ २५ हजारांच्या आसपास प्रकरणे प्रलंबित असून, ती देखील एप्रिल अखेरपर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूणच सर्व प्रकरणांपैकी सुमारे ७५ टक्के मोजणी प्रकरणे निकाली निघाली आहेत.
यंदा राज्यात मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात नागपूर विभागाची आघाडी असून, त्यांनी सुमारे ९२ टक्के प्रकरणे निकाली काढली आहेत. तर पुणे विभागात राज्यात सर्वांत अधिक प्रकरणे (सुमारे ३५ हजार) प्रलंबित होती. या विभागातील देखील ७० टक्के मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे.
भूमि अभिलेख विभागाच्या अंतर्गत पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर हे महसुली विभाग आहेत. या विभागाच्या अंतर्गत असलेल्या उपाधिक्षक कार्यालयातील प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आले होते.
त्यानुसार डिसेंबर २०२४ या कार्यकाळातील मोजणी प्रकरणे मार्चअखेर निकाली काढण्यावर भूमिअभिलेख विभागाने लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार प्रलंबित असलेली मोजणी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यावर अधिकारी, सर्व्हेअर यांनी भर दिला. त्यामुळेच ही प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत.
राज्यातील भूमिअभिलेख महसुली विभागातील मोजण्यांची स्थिती (एप्रिलपर्यंत शिल्लक; आकडा हजारांमध्ये)
विभाग-- मोजण्या शिल्ल्लक-- निकाली--शिल्लक- टक्केवारी
पुणे--- ३५,१०२ ----- २४,६७९---१०,४२३---७०
कोकण--- ९,४४०----७,१५१-----२,२८९---६७
नाशिक--- १३,०९२---८,५४०---- ४,५५२---६५
छत्रपती संभाजीनगर --११,७५५--८,१७७--- ३,५७८---७०
अमरावती ---१०,९४५ --- ७,३६९--३,५७६---६७
नागपूर ---७,६९०-----७,०९८--- ५९२ ---९२
एकूण--- ८८,०२४---- ६३,०१४--- २५,०१०--७५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.