Land Survey Cases: महिनाभरात १२०० जमीन मोजणी प्रकरणे पूर्ण

Haveli Revenue Office: राज्य शासनाच्या १०० दिवस कामाच्या नियोजनांतर्गत हवेली भूमी अभिलेख कार्यालयाने एका महिन्यात विक्रमी १२०० जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा केला आहे.
Land Survey
Land SurveyAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्य शासनाने १०० दिवसांच्या कामाचे नियोजन प्रकल्पांतर्गत जमीन मोजणीची प्रकरणे गतीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हवेली भूमी अभिलेख कार्यालयाने या प्रकल्पांतर्गत मार्च महिन्यात १ हजार २०० जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, अशी माहिती हवेली भूमी अभिलेखचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांनी दिली.

साधारणपणे याच कार्यालयात महिन्याला सरासरी ६०० जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढली जातात, मात्र, या कार्यालयाने शिस्तबद्ध काम करीत एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मोजणी प्रकरणे निकाली निघण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यात जमीन मोजणीची सर्वाधिक प्रकरणे हवेली कार्यालयात दाखल होतात.

Land Survey
Land Survey : पंढरपुरातील मिळकतींची ड्रोनद्वारे होणार मोजणी

अर्जाची संख्या अधिक असल्याने मोजणी करण्यास विलंब होतो, या कार्यालयामध्ये दरमहा ८०० पेक्षा जास्त मोजणी प्रकरणे येत असतात. महसूल विभागाने डिसेंबर २०२४ अखेर आवक झालेल्या सर्व मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना भूमी अभिलेख विभागाला दिल्या होत्या, या सर्व पार्श्‍वभूमीवर हवेली उपअधीक्षक कार्यालयाने जमीन मोजणीची प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला.

Land Survey
e-Mojani Land Survey : जमीन मोजणी प्रक्रिया झाली डिजिटल ; मोजणीची ‘क’ प्रत घरबसल्या मिळणार

सद्यःस्थितीत या कार्यालयामध्ये फक्त जानेवारी २०२५ नंतर प्राप्त झालेली मोजणी प्रकरणे कार्यवाही करण्यासाठी प्रलंबित आहेत. राज्य शासनाने ९० दिवसांच्या आत मोजणीची प्रकरणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

सर्वप्रथम उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले. आलेल्या अर्जांची छाननी करून गावनिहाय मोजणीची प्रकरणे भूकरमापकांना देण्यात आली. तसेच एकाच मार्गावरील किंवा शेजारच्या गावातील मोजणीची प्रकरणे तिथे जाणाऱ्या भूकरमापकांना देण्यात आली, जेणेकरून एकाच गावात गेल्यावर त्या गावातील मोजणीचे इतर अर्जसुद्धा निकाली काढण्यात आले.
अमरसिंह पाटील, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, हवेली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com