Environmental Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Environmental Conservation : पर्यावरण संवर्धनासाठी बीज चेंडू बनविण्याचा संकल्‍प

Seed Collection : उन्हाळ्याची सुटीत खेळ, मनोरंजन, पर्यटनाला मुलांना विशेष आवडते. मात्र माणगावमधील विद्यार्थी पर्यावरण जतन व संरक्षणासाठी सरसावले असून बीज चेंडू (सीड बॉल) तयार करण्यात तसेच बियांचे संकलन करण्यात रमले आहेत.

Team Agrowon

Raigad News : उन्हाळ्याची सुटीत खेळ, मनोरंजन, पर्यटनाला मुलांना विशेष आवडते. मात्र माणगावमधील विद्यार्थी पर्यावरण जतन व संरक्षणासाठी सरसावले असून बीज चेंडू (सीड बॉल) तयार करण्यात तसेच बियांचे संकलन करण्यात रमले आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील अनेक शाळा व संस्था दरवर्षी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेताच. यंदा माळरानावर, जंगलात, डोंगर-दऱ्यात बीज चेंडूंची उधळण होणार असून अनेक विद्यार्थी मे महिन्याच्या सुटीत मातीचे बीज चेंडू बनवण्यात, बिया जमा करण्यात मग्न झाले आहेत.

उन्हाळ्यात विविध प्रकारची फळे, फुलांच्या बिया सहज उपलब्ध होतात. या बियांचा योग्य उपयोग केल्‍या परिसरात घनदाट वृक्षवल्‍ली बहण्यास नक्‍कीच मदत होते. निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या, घरी आणलेल्या फळांच्या बिया संग्रहित करून त्‍यांचे मातीचे चेंडू बनवून सुकवले जातात.

पावसाळा सुरू होताच हे बीज चेंडू माळरानात, डोंगरात फेकले जातात. त्‍या दरम्‍यान पोषक वातावरण असल्‍याने त्‍यांची रुजवात चांगली होते. ठाणे, कल्याण, रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा व खासगी शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

माती व बिया गोळा करणे, मातीचे चेंडू बनविणे, त्यात बी रोपण करणे अशी कामे विद्यार्थी घरी, समूहात करीत आहेत. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बिया वाळवून त्याची पाकिटे तयार केली आहेत.

या बिया मातीत टाकून त्‍यांचे बीज चेंडू तयार केले आहेत. पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या हस्ते बीज चेंडूंची परिसरातील जंगलात, माळरानावर उधळण होणार आहे. तर काही ठिकाणी त्‍यांचे रोपण करण्यात येणार आहे.

उपक्रमातून माळरानावर, नदी किनारी वृक्षारोपण करणे शक्य आहे. यातून मुलांना विविध प्रकारच्या बियांची ओळख होते, वृक्ष लागवडीचे महत्त्व कळते, वृक्षसंवर्धनाचा संस्कार अंगवळणी पडतात. त्‍यामुळे पालकही सहभागी झाले आहेत.

उपक्रमांतर्गत तुळस, शेवगा, विविध फळे व भाज्या यांचे बीज चेंडू बनवण्यात आले आहेत. ते पावसाळ्यापूर्वी जंगलात माळरानात पसरवण्यात येणार आहेत. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला आहे. बीज चेंडूच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व संवर्धनाची प्रेरणा मिळाली आहे.
प्रताप गीते, पर्यावरणप्रेमी
पावसाळ्यात रोपवाटिका तयार करण्याचा मानस आहे. त्यासाठी विद्यार्थी विविध बियाणे जमवत आहेत. या बियांची रुजवणूक होईल आणि वनसंपदेत वाढ होईल.
भरत काळे, शिक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT