Minister Devendra Fadnavis : शेतकऱ्यांपर्यंत वेळेत खते, बी- बियाणे पोहोचवा

Fertilizer Supply : खरीप हंगामापूर्वी जिल्हयात खते व बियाणांचा मुबलक साठा जरी असला, तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचली पाहिजे.
 Devendra Fadnavis
Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Gadchiroli News : ‘‘खरीप हंगामापूर्वी जिल्हयात खते व बियाणांचा मुबलक साठा जरी असला, तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचली पाहिजे,’’ अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

खरीपपूर्व हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी सादरीकरण केले. गडचिरोली जिल्हयात १.३४ लक्ष शेतकरी खातेदार आहेत.

एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वहिताखालील २.५४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ६७,००० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. जिल्ह्यात खरीप २.०९ लाख हेक्टर, ०.३६ लाख हेक्टर रब्बी व उन्हाळी ०.०९ लाख हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी गेल्या वर्षी झाली.

या वर्षी एकूण २,२५,९४० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी करण्याचे नियोजन आहे. यात भात १.८७ लाख हेक्टर, मका ३,००० हेक्टर, तूर ८,००० हेक्टर, सोयाबीन १६०० हेक्टर, तीळ ९०० हेक्टर व कापूस २१,१२० हेक्टर वर करण्याचे नियोजन आहे.

 Devendra Fadnavis
Fertilizer Supply : मे महिन्याअखेर सर्व खतांचा पुरवठा करा

पालकमंत्री फडणवीस यांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार चढउतार होण्याची शक्यता असल्याने पीक वाचविण्यासाठी उपाययोजनांचे नियोजनही कृषी विभागाला करण्याचे सांगितले.

तसेच जलयुक्त शिवार योजनेतून कामे हातात घेऊन पावसाचे पाणी जास्तीत जास्त कसे साठवून ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जर आपण पाणी अडवून जिरविले तर निश्चितच रब्बी पिकांनाही फायदेशीर ठरेल.

यातून जिल्ह्यातील उत्पादकता वाढेल. कृषिविषयक योजनांच्या प्रसारासाठी कार्यशाळा, बैठकांचे आयोजन गावागावात करा. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद मोहीम वाढवा, असेही ते म्हणाले.

‘खरीप हंगाम यशस्वी करा’

जिल्ह्यात रब्बी क्षेत्र वाढले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल. त्यामुळे आता येणारा खरीप हंगाम यशस्वी करा.

पीककर्ज मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक असून, शेतकऱ्यांचा पीकविमाही काढून त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com