Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

Maratha Survey : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या सर्वेक्षणाची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या सर्वेक्षणासाठी प्रगणक व पर्यवेक्षक हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती संकलित करीत आहेत. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गजानन खराटे यांनी सोमवारी (ता. २९) विभागीय आढावा बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे होत असलेल्या सर्वेक्षणाचा व जमीन अधिग्रहणाविषयीचा आढावा घेण्यात आला. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. प्रा. गोविंद काळे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, महानगर पालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, उपायुक्त जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच लातूर आणि नांदेड महापालिका आयुक्त बैठकीत सहभागी झाले होते.

प्रा. डॉ. काळे म्हणाले, की मराठवाडा विभागात आयोगाने नेमून दिलेले सर्वेक्षणाचे काम महसूल विभागाने चांगले केले आहे. या बाबत आयोगामार्फत मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन. कोणत्याही जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील एक ही कुटुंब सर्वेक्षणातून सुटू नये.

सर्वांची नोंद घेण्याची खबरदारी जिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी यांनी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली. सर्वेक्षणासाठी नवीन १.०३ ॲपद्वारे करण्यात यावे. आवश्यकतेनुसार प्रगणकाच्या संख्येत वाढ करावी,

३१ जानेवारीपर्यंत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री. आर्दड यांनी दिले. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंब सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय आढावा उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी आयोगाच्या तिन्ही सदस्यांसमोर सादर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

Gokul Dudh Sangh: गोकुळ दूध संघ आता आईस्क्रीम, चीज बाजारात आणणार, सभेत घोषणा, बैठकीत नेमकं काय ठरलं?

Rain Crop Damage : अतिवृष्टी, पुराने सांगलीत ७ कोटींचे नुकसान

Gold Price Rise: सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये जबरदस्त तेजी; नवीन उच्चांकाने गुंतवणूकदारांची धाकधुक वाढली

Kunbi Certificate: कुणबी दाखले देण्याची प्रक्रियी सुरु; मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

SCROLL FOR NEXT