Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्याच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींच्या तक्रारी

Crop Insurance Scheme : गेल्या हंगामात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना योग्य भरपाई दिली गेली नाही. या विषयावर रविवारी (ता. २२) सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पडसाद उमटले.

Team Agrowon

Akola News : गेल्या हंगामात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना योग्य भरपाई दिली गेली नाही. या विषयावर रविवारी (ता. २२) सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पडसाद उमटले. जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी या विषयावर विमा कंपनीविरुद्ध रोष व्यक्त केला.

त्यामुळे ही परिस्थिती पाहता राज्यस्तरावरील यंत्रणेसमवेत पुढील दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच शासन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.

नियोजन भवनात अतिवृष्टी, पीकविमा, पीककर्ज वाटप आदींबाबत, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, युवा कौशल्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा, वयोश्री, तीर्थदर्शन, बळीराजा सवलत व इतर योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.

खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या सीईओ बी. वैष्णवी, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपवनसंरक्षक कुमार स्वामी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, ‘‘पीक विम्याबाबतच्या तक्रारी पाहता संबंधितांवर कारवाई केली जाईल. अतिवृष्टीने, तसेच सततच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली जाईल. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेत पात्र व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तालुकास्तरावर शिबिरे घ्यावीत. कर्जाच्या पुनर्गठन योजनेत शेतकऱ्यांची संमती न घेताच परस्पर पुनर्गठन केल्याच्याही तक्रारी आहेत. याबाबत तपास करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खरीप पीक कर्जाचे जिल्ह्यात ८७ टक्के वितरण झाले आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर विचारात न घेता कर्ज द्यावे. भरडधान्य ज्वारी खरेदी केंद्रे जास्तीत जास्त वेळ चालू ठेवावीत जेणेकरून खरेदीला वेग येईल. खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT