Natural Disaster Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Disaster : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारने दिली १०६ कोटी निधी वितरणास मान्यता

Maharashtra Government Funds : २०२० ते २०२२ या कालावधीत राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या निधी वाटपास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वने मंत्रालयाने शासन निर्णय काढला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात वर्ष २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांसह इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर बाधितांच्या नुकसानीचा पंचनामे करण्यात आले होते. याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतना मदत वाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या महसूल व वने विभागाने याबाबत बुधवारी (ता.२१) शासन निर्णय काढला. तसेच १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली आहे. 

याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी माहिती देताना, या निर्णयाचा राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी व बाधितांना दिलासा मिळणार असे म्हटले आहे. वर्ष २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकासह इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे सरकारने बाधित शेतकरी व नागरिकांना मदत करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी व नागरिकांनी केली होती. 

त्याप्रमाणे शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीच्या मदत वाटपासाठी राज्य सरकारने १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये मंजूर केले आहेत, असेही मंत्री पाटील यांनी म्हटले आहे. तसेच प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे संबंधित शेतकरी व बाधितांना दिलासा मिळेल अशी असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

कोरोनामुळे अडचणी आल्या

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर कारणांमुळे या निधी वाटपात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. यामुळे निधी वाटपावर कार्यवाही झाली नव्हती. तर पिकांच्या व इतर नुकसानासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना  सर्व विभागीय आयुक्तांना करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यावरून निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT