Nanded News : नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लाख रक्कम मंजूर केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ५६ हजार ३०२ शेतकऱ्यांना ६०४ कोटी ३८ लाख ३७ हजार रुपये रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाइन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे.
माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली. नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यात खरिपातील जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकांसह शेतजमिनीचे पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
हा फटका जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना बसला होता. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ८१२ कोटी ३८ लाख साठ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती. या मागणीनुसार शासनाने नांदेडला ८१२ कोटींचा निधी मंजूर केला. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ५६ हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ६०४ कोटी ३८ लाख रकमेचे वाटप
करण्यासाठीची माहिती ऑनलाइन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. उर्वरित दोन लाख २७ हजार ६१३ शेतकऱ्यांची माहिती लवकरच भरण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रणालीवर माहिती अपलोड करण्याचे प्रमाण ७५ टक्के झाले असल्याची माहिती सूत्राने दिली. माहिती भरण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे संदर्भ क्रमांक (व्ही.के.) संबंधित गावाच्या तलाठ्यांना देण्यात आले आहेत.
(व्ही.के.) या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा, आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम जमा होत असल्याची माहिती अनेक लाभार्थ्यांनी दिली.
शेतकऱ्यांची माहिती पुढील दोन दिवसांत भरण्यात येणार आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२४ या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक घ्यावा व ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, जेणे करून त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.