Crop Damage Compensation : सांगलीतील १७ हजार शेतकरी अतिवृष्टी भरपाईच्या प्रतिक्षेत

Heavy Rainfall Loss : गतवर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी, मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी आणि धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.
Crop Damage Compensation
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याचा फटका चार तालुक्यांना बसला होता. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यातील १७ हजार ३५ शेतकऱ्यांची सुमारे ६ हजार १४५ हेक्टरवरील जिरायती, बागायती आणि फळ अशी पिके वाया गेली. ऊस, सोयाबीन, मका, ज्वारी, हळद, भाजीपाल्यासह १० कोटी ९२ लाख रुपयांच्या भरपाईची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

गतवर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी, मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी आणि धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली गेली.

अतिवृष्टी आणि पुराचा फटका मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यांना फटका बसला. पुराच्या पाण्यामुळे ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग, पपई, केळी, द्राक्षांसह भाजीपाला वाया गेला.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : कालवा फुटीच्या नुकसानीबाबत जलसंपदामंत्र्यांकडून पुन्हा आश्‍वासन

वारणा, कृष्णा नदीकाठावरील १७ हजार ३५ शेतकऱ्यांची ६ हजार हेक्टरवरील पिके वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ११ कोटी ९२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवालात स्पष्ट झाले. तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

पुराच्या पाण्याने सर्वाधिक ४ हजार ८०५ हेक्टरवरील ऊस वाया गेला आहे. सोयाबीन ५६० हेक्टर, भुईमूग ४६७ हेक्टर, भात ४१ हेक्टर, मका १०.३८ हेक्टर, ज्वारी ७.७१ हेक्टर, हळद ४.३६ हेक्टर, कडधान्ये १७.९० हेक्टर, फुलपिके १ हेक्टर, चारा पिके १७० हेक्टर भाजीपाला ७३.५३ हेक्टर असे मिळून ६ हजार १५९ हेक्टरवरील पिकांचे १० कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : पीक नुकसान भरपाई अनुदानाची अनेक गावांना प्रतीक्षा

फळ पिकांचे ३६ शेतकऱ्यांचे पेरू १.१० हेक्टर, पपई ४.१५ हेक्टर, केळी २.९७ हेक्टर असे मिळून ८.२२ हेक्टरवरील २ लाख ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.मिरज तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ४ हजार ३२ शेतकऱ्यांचे सुमारे २ हजार ५८८ हेक्टरवरील ४ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाळवा तालुक्यातील ५ हजार १७८ शेतकऱ्यांचे १ हजार ६४९ हेक्टरवरील ३ कोटी ६ लाख, शिराळा तालुक्यातील ५ हजार ५०२ शेतकऱ्यांचे १ हजार ७१८ शेतकऱ्यांचे ३ कोटी ९ लाख, पलूस तालुक्यातील १ हजार २७२ शेतकऱ्यांचे २०३ हेक्टरवरील ३४ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. शेतकरी सहा महिन्यांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुकानिहाय नुकसान झालेले शेतकरी व क्षेत्र

तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज ४,०३२ २,५८८

वाळवा ५,१७८ १,६४९

शिराळा ५,५०२ १,७१८

पलूस १,२७२ २०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com