Sangli APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Jaggery Production : कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन होते. कोल्हापूरच्या बरोबरीने सांगली बाजार समितीमध्येही गुळाची आवक होत होती. यंदा मात्र येथील गूळ उत्पादन व्यवसाय कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Team Agrowon

Sanglin News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतमधील काही व्यापारी बाहेरच्या बाहेर गुळाचा व्यापार करतात. यामुळे येथील यार्डात गुळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याचा फटका हमालांना बसत असल्याने गुळाचे सौदे बंद पाडण्यात आले होते.

या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी संचालक, व्यापारी, खरेदीदार आणि हमाल यांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी यांची समिती तयार करण्यात आली आहे. आठ दिवसांत ही समिती गूळप्रश्नी निर्णय घेणार आहे, अशी माहिती समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन होते. कोल्हापूरच्या बरोबरीने सांगली बाजार समितीमध्येही गुळाची आवक होत होती. यंदा मात्र येथील गूळ उत्पादन व्यवसाय कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी होऊ लागली आहे. काही खरेदीदार व अडते सांगलीत परवाना असताना गुळाचा व्यापार परस्पर बाहेर करतात. असा आक्षेप हमालांचा आहे. समितीने यार्डाबाहेर व्यापाऱ्यांनी व्यापार करू नये, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला होता.

गुळाचे सौदे सुरू राहण्यासाठी सरकार, बाजार समितीने वेळीच उपायोजना करण्याची मागणी हमालांनी केली होती. गुळाच्या व्यापाराबाबत तत्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हमाल पंचायतीच्या वतीने देण्यात आला होता. त्यावर हमाल प्रतिनिधी, व्यापारी आणि समिती पदाधिकारी यांच्यात बैठक होऊन प्रश्न सोडविण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा

Labor Migration : रोजगाराअभावी पुसद तालुक्‍यात मजुरांचे स्थलांतर

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी २८.५३ कोटींचा निधी मंजूर

E-Peek Pahani : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीकडे पाठ

Flood Crop Damage : संकटाच्या काळातही शेतजमिनी घेण्यासाठी चाचपणी

SCROLL FOR NEXT