Sangli APMC Election News
Sangli APMC Election NewsAgrowon

Sangli APMC : सांगली बाजार समिती शेती प्रयोगशाळा उभारणार

Agriculture Laboratory : सांगली बाजार समितीतर्फे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी शेती प्रयोगशाळा उभारण्याचा संकल्प असल्याचे बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी बुधवारी (ता. २७) सर्वसाधारण सभेत व्यक्त केला.
Published on

Sangli News : सांगली बाजार समितीतर्फे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी शेती प्रयोगशाळा उभारण्याचा संकल्प असल्याचे बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी बुधवारी (ता. २७) सर्वसाधारण सभेत व्यक्त केला. सावळी येथील बाजार समितीच्या जागेवर बेदाणा ड्रायफ्रूट मार्केट, जत येथे डाळिंब लिलाव, कवठेमहांकाळ येथे पेट्रोल पंप आणि सर्व कार्यालय सीसीटीव्हीच्या कक्षेत आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाजार समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात बारावी सर्वसाधारण सभा सभापती सुजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेसाठी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, उपसभापती रावसाहेब पाटील, सचिव महेश चव्हाण उपस्थित होते.

Sangli APMC Election News
Sangli APMC Election : अंतर्गत वादांमुळे भाजपचे सत्तेचे स्वप्न विरले

सभापती शिंदे म्हणाले, की बाजार समितीच्या विकासासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. विष्णूअण्णा पाटील फळ बाजारात लिलावासाठी नव्याने मोकळ्या जागेत इमारत बांधली जाईल. मिरजेत मोठ्या प्रयोगशाळेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला असून, त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

Sangli APMC Election News
Sangli APMC Election : सांगली बाजार समितीत भाजपचा धुव्वा

कवठेमहांकाळ उपबाजार समिती फायद्यात येण्यासाठी येथे पेट्रोल पंप सुरू करीत आहे. जतला डाळिंब लिलाव, माडग्याळला जनावरांचा बाजारात सुविधा, सावळीतील जागेवर आधुनिक बेदाणा, ड्रायफ्रूट उभारले जाईल. बाजार समिती मुख्यालयासह सर्व उपबाजार सीसीटीव्हीने जोडले जातील. त्यातून पारदर्शकता येईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसाठी पाठपुरावा करू.

समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी समितीच्या गेल्या तीन वर्षांतील जमा-खर्चाचा आढावा घेतला. नफा-तूट जाहीर केला. सन २०१८-१९ आणि २०१९-२० मधील लेखापरीक्षण अहवालही वाचून दाखविला. या सभेला सर्व संचालक, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, अशोक पाटील, हमाल माथाडी महामंडळाचे उपाध्यक्ष विकास मगदूम, उपस्थित होते. उपसभापती रावसाहेब पाटील यांनी आभार मानले.

‘उत्पन्न ५० कोटी झाले पाहिजे’

सांगली बाजार समितीत हळद, गूळ, बेदाण्यासाठी चांगली बाजारपेठ आहे. विविध जिल्ह्यासह पर राज्यातूनही आवक होते, त्यामुळे ५० कोटी रुपये उत्पन्न झाले पाहिजे. सध्या २५ ते ३० कोटी रुपये उत्पन्न असणे अपेक्षित आहे. बाजार समिती ७५ व्या वर्षांकडे वाटचाल करीत असून देशातील पहिल्या क्रमांकाची बाजारपेठ बनविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना विशाल पाटील यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com