Jaggery Market : श्रावणाने वाढविला गुळाचा गोडवा

Jaggery Rate : श्रावणामुळे गुजरात येथून मागणी वाढल्याने बिगर हंगामी गुळाच्या दरात क्विंटलला तब्बल ४०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
Jaggery Market
Jaggery MarketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : श्रावणामुळे गुजरात येथून मागणी वाढल्याने बिगर हंगामी गुळाच्या दरात क्विंटलला तब्बल ४०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या येथील बाजार समितीत येणाऱ्या गुळास क्विंटलला किमान ३७०० ते कमाल ४६०० रुपयापर्यंत दर मिळत आहे.

बाजार समितीत एक ते दोन दिवसाला सहा ते सात हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गेल्या सप्ताहापासून ही दरवाढ झाल्याने गूळ उत्पादकांत समाधान आहे. श्रावण महिन्यामुळे गुजरातमधून अचानक वाढलेली गुळाची मागणी आणि तेथील शीतगृहामध्ये गूळ शिल्लक नसल्याने व्यापाऱ्यांनी गुळाची खरेदी वाढवली.

याचा सकारात्मक परिणाम येथील बाजार समितीत येणाऱ्या गुळावर झाला. सातत्यपूर्ण मागणी असल्याने पुढील एक महिना तरी गुळाचे भाव चांगले राहतील, अशी अपेक्षा बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.

Jaggery Market
Jaggery Market : कोल्हापुरात बिगर हंगामी गुळाची मर्यादित आवक; दरही स्थिर

जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पुराची स्थिती होती. ज्या भागातून प्रामुख्याने गूळ बाजार समितीत येतो, त्या करवीर सह अन्य लगतच्या तालुक्यांमध्येही पुराचे पाणी होते. यामुळे अनेक मार्गही बंद होते. याचा प्रतिकूल परिणाम वर्षभर सुरू असणाऱ्या गुऱ्हाळघरांवर झाला.

पावसामुळे गूळ निर्मिती करणे अशक्य झाल्याने गेले आठ ते दहा दिवस बाजार समितीत गुळाची आवक थंडावली होती. श्रावण सुरू होण्याअगोदर काही दिवस जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी आला.

यामुळे गुऱ्हाळ घर मालकांनी उसाची शोधाशोध करून गुऱ्हाळे सुरू करण्याला प्राधान्य दिले. आधी कमाल ४२०० रुपयेपर्यंत दर होता. श्रावण सुरू झाल्यानंतर मात्र हा दर ४६०० रुपयांपर्यंत गेला आहे.

गुजरातमधील अनेक व्यापारी शीतगृहांसाठी गुळाची खरेदी करतात. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोल्हापूर बरोबरच कर्नाटकामध्येही बारमाही गुळाचे उत्पादन सुरू झाले आहे. गुळाचा व्यवस्थापन खर्च टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी शीतग्रहांमध्ये गूळ खरेदी करण्याचे प्रमाण कमी केले. यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातही गुळाच्या दरामध्ये फारशी वाढ झाली नाही.

Jaggery Market
Jaggery Production : नैसर्गिक ऊस शेतीतून बनविलेला ‘पृथ्वी ब्रॅण्ड’ गूळ

श्रावणात वाढली मागणी

गुजरातमध्ये श्रावणामध्ये गुळाचा वापर नेहमीपेक्षा अधिक वापर होतो. यामुळे घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांकडूनही गुजरातमध्ये गुळाला सातत्याने मागणी राहिली. त्या तुलनेत कोल्हापुरातून येणारा गूळ कमी असल्याने यंदा प्रथमच गुजरातमध्ये गुळाची काहीशी चणचण भासली.

परिणामी गुजरात मधील व्यापाऱ्यांनी चढ्या दराने कोल्हापुरातील गुळाची खरेदी केली. नागपंचमी नंतर आता गणेश चतुर्थी सारखा सण येणार असल्याने गुळाच्या मागणीत वाढच होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरी गुळाला विशेष मागणी

यंदा कर्नाटकपेक्षा कोल्हापुरी गुळाला जास्त मागणी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कोल्हापूर ब्रँड नेमणे हा गूळ जात असल्याने येणाऱ्या काळात कोल्हापुरातील गुराळ घरांना चांगली संधी आहे. कर्नाटकी गुळापेक्षा कोल्हापुरी गुळाला दरही चांगला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूर बाजार समितीतील प्रतीनुसार शनिवारचे (ता.१०) दर (क्विंटल)

प्रत...दर

१)...४६०० -४६००

२)...४२०० -४५००

३)...३८००-४१९०

४)...३७००-३७९०

१ किलो बॉक्स...३९७५- ४९७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com