Jan Aarogya Card Agrowon
ॲग्रो विशेष

PM Jan Aarogya Scheme : जनआरोग्य कार्ड मिळण्यासाठी समिती

Team Agrowon

Nanded News : गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असून त्याचा कोट्यावधी लोकांनी लाभ घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र ही समिती शासनाने नियुक्ती केली आहे. प्रत्येकाला जनआरोग्य कार्ड मिळावे, यासाठी जिल्हा पातळीवर लवकरच स्वतंत्र समिती नियुक्त करू, असे प्रतिपादन प्रधानमंत्री जनआरोग्य समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. १४) झालेल्या बैठकीत डॉ. शेटे बोलत होते. या बैठकीस आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली चौगुले यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शेटे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येकाला कार्ड मिळावे यासाठी पर्यटन, तीर्थक्षेत्र या ठिकाणी जनजागृती केली जाईल. हे कार्ड सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यासाठी काही जिल्ह्यात तांत्रिक अडचणी आढळून आल्या आहेत. त्यावर योग्य विचार करून जिल्हा पातळीवर एक समिती स्थापन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी हे सचिव म्हणून काम पाहतील. यात महापालिका, नगरपंचायत अधिकारी, सीएससी सेंटरचे प्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. नांदेड येथून हैदराबाद येथे अनेक रूग्ण उपचारासाठी जातात.

या रूग्णांना जनआरोग्य योजनांचा लाभ मिळावा, या दृष्टीने तेथील मान्यताप्राप्त संलग्न असलेल्या रूग्णालयाची माहिती येथील आरोग्य विभागाचे समन्वयक लवकरच उपलब्ध करून देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नगरपंचायत अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सहभागातील ही समिती जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना तत्काळ वैद्यकीय सुविधेच्या दृष्टीने जनआरोग्य कार्ड कसे उपलब्ध होतील, याची काळजी घेईल.
डॉ. ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT