Ayushman Card Scheme : देशात ३० कोटी आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा दावा

AB-PMJAY Scheme : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB-PMJAY) देशात आतापर्यंत ३० कोटी हून अधिक आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली असून यापैकी सर्वाधिक कार्ड हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात झाले आहेत.
Ayushman Card Scheme
Ayushman Card SchemeAgrowon

Pune News : आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेत आतापर्यंत देशात ३० कोटी आयुष्मान कार्ड काढण्यात आले असून यापैकी सर्वाधिक कार्ड हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काढण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची असून ती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली. ही योजना आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींनी सुरू केली. त्यानंतर यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षात १६.७ कोटी कार्ड बनवण्यात आले असून या यंदा २०२३-२४ मध्ये आतापर्यंत ७.५ कोटी कार्ड बनवण्यात आले आहेत.

याबाबत आरोग्य मंत्रालयाने रविवारी(ता.१४ रोजी) सांगितले की, आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लोकांवर रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. तर आतापर्यंत ६.२ कोटी लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. ज्याचा खर्च ७९,१५७ कोटी झाला आहे. तसेच, ही योजना समाजात समानतेला प्रोत्साहन देत असून ३० कोटी कार्डांपैकी ४९% कार्डे ही महिलांची असून ४८% महिला उपचार घेत आहेत.

Ayushman Card Scheme
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच

योजनेचा तिसरा टप्पा

आयुष्मान योजनेचा तिसरा टप्पा (आयुष्मान ३.०) हा १७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून लोक ऑनलाइन नोंदणी करून हे कार्ड घेत आहेत.

आयुष्मान कार्ड अॅप

आयुष्मान कार्डसाठी केंद्र सरकारने मोबाईल फोनवरही आयुष्मान कार्ड अॅपची सुविधा केली आहे. येथे अर्ज करण्याची सुविधा असून फोनवरच नोंदणी प्रक्रिया, ओटीपी, आयरिस, फिंगरप्रिंट आणि फेस-आधारित व्हेरिफिकेशन होते.

आवश्यक कागदपत्रे

आयुष्मान कार्डसाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकार फोटो, पॅन कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यानंतर, या योजनेत नोंदणी होईल.

Ayushman Card Scheme
Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात

पात्र आहात की नाही कसे कळेल

आयुष्मान कार्डसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी कॉल करा १४५५५ वर कॉल करू शकता. तसेच pmjay.gov.in साइटवर भेट देऊन याबाबत पात्रता तपासू शकता.

कोणत्या आजारांचा समावेश

या योजनेत जुन्या आजारांसह नव्या अशा आजारांचा समावेश आहे. कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च या योजनेतून केला जातो. ज्यात वाहतूक खर्च देखील आहे. तसेच सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स, उपचारांचाही यात समावेश आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५ कोटींहून अधिक लोकांनी उपचार घेतले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com