
Nagar News : शेतकऱ्यांना शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी कृषी आणि कृषीशी निगडीत असणाऱ्या विविध विभागांच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून नगर जिल्ह्यात आतापासून १२ लक्ष १० हजार ७६८ शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा मिळाला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ४ हजार ८७६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, समान्य लोकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे हा कार्यक्रम झाला. आतापर्यंत या योजनेतू नगर जिल्ह्यातील १२ लाख १० हजार ७६८ शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, कल्टीवेटर, रोटावेटर इत्यादी प्रकारची यंत्र अवजारे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर लाभ देण्याला आहे.
योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प महिला शेतकरी यांना ५० टक्के अनुदान तसेच इतर बहुभुधारक शेतकरी यांना ४० टक्के अनुदान वितरित करण्यात येते. उपक्रमांतर्गत ४ हजार ८७६ शेतकऱ्यांना ३५ कोटी ८२ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ६ हजार ५०५ शेतकऱ्यांना १९ कोटी ९६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदानांतर्गत २४ हजार ३०० शेतकऱ्यांना २८ कोटी ५१ लक्ष अनुदान वितरित करण्यात आले. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत ५५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
कांदाचाळ घटकासाठी ३६० शेतकऱ्यांना ३ कोटी ५ लाख, मागेल त्याला अस्तरीकरण घटकासाठी २२७ शेतकऱ्यांना १ कोटी ५५ लाख, मागेल त्याला हरितगृह शेडनेट घटकासाठी ४५ शेतकऱ्यांना ३६ लाखाचे अनुदान दिले.
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (पीएमएफएमई) योजनेतून उपक्रम कालावधीमध्ये अन्नप्रक्रिया अंतर्गत ८१ शेतकऱ्यांना ५ कोटी ५३ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेतून ३७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना ७ कोटी ५४ लाख रुपयांचे अनुदान दिले असे सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.