Digital Ration Card : आता काढा घरबसल्या ‘डिजिटल शिधापत्रिक्रा’

Online Ration Card : तहसील कार्यालयाने डिजिटल रेशनकार्ड’ (शिधापत्रिका) देणे सुरू केले आहे. आतापर्यंत ६० नवीन रेशनकार्डधारकांना ऑनलाइन डिजिटल कार्ड देण्यात आले.
Ration Card Scheme
Ration Card Schemeagrowon
Published on
Updated on

Jalgaon News : तहसील कार्यालयाने डिजिटल रेशनकार्ड’ (शिधापत्रिका) देणे सुरू केले आहे. आतापर्यंत ६० नवीन रेशनकार्डधारकांना ऑनलाइन डिजिटल कार्ड देण्यात आले. यापुढे आता नागरिक घरबसल्या रेशनकार्ड काढता येणार आहे. यासह सेतू केंद्र, सीएससी केंद्रात जाऊन ऑनलाइन अर्ज केल्यावर रेशनकार्ड त्यांना मिळेल.

यामुळे रेशनकार्डासाठी दलालांकडे जाण्याची किंवा तहसील कार्यालयात येण्याची गरज नसेल. तसेच नियमित शुल्काशिवाय अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. यामुळे गोरगरिबांची दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबणार आहे. ऑनलाइन डिजिटल कार्डाची प्रिंट काढून ते आधारकार्डासारखे वापरता येणार आहे.

Ration Card Scheme
Ration-Aadhar Linking : रेशन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी ...

त्यावर संबंधित लाभार्थी कोणत्या प्रकारातील (बीपीएल, केशरी, पांढरे कार्ड) आहे. याची माहिती असेल. डिजिटल कार्डावरच त्या कुटुंबातील सदस्य संख्या, आधारकार्ड क्रमांक असेल. सध्या जळगाव शहरासह तालुक्यात रेशनकार्डधारकांची संख्या एक लाख २२ हजार ८५५ आहे; तर रेशन दुकाने २१४ आहे.

Ration Card Scheme
Ration Card Scheme : आता देशात कुठेही रेशन धान्य मिळणार, काय आहे एक देश एक रेशन कार्ड योजना

दलालांना चाप

तहसील कार्यालयात रेशनकार्ड काढून देण्यासाठी अनेक दलाल कार्यरत आहेत. ते लाभार्थ्यांकडून रेशनकार्ड काढून देण्यासाठी सुमारे पाचशे ते दोन हजार रुपये उकळतात. दलालांबाबत अनेकांनी तक्रारी केल्यावर तहसीलदार नामदेव पाटील यांनी पुढाकार घेत ऑनलाइन डिजिटल रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे दलालांना आता चाप बसणार असून, शासकीय शुल्कातच सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळेल.

जळगाव शहरासह तालुक्यात डिजिटल रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ६० लाभार्थ्यांना ऑनलाइन रेशनकार्ड देण्यात आले. आता नागरिक स्वत: ऑनलाइन रेशनकार्ड काढू शकतात. त्यासाठी दलालांकडे जाण्याची गरज नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल रेशनकार्ड देण्यात येत आहे.
- नामदेव पाटील, तहसीलदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com