Maratha Reservation  Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation News : मराठा-कुणबींसाठीची समिती संविधानिक

Mumbai High Court On Maratha Reservation : मराठा समाज कुणबी असल्याचे दाखले शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : मराठा समाज कुणबी असल्याचे दाखले शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. तसेच ७ सप्टेंबर रोजी स्थापन केलेल्या या समितीची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आहे.

त्यामुळे ती संविधानिक असल्याचा निर्वाळा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. त्यामुळे ओबीसी मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक नितीन चौधरी यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, वृषाली जोशी यांनी या प्रकरणी निर्णय दिला. सोमवारी (ता. ९) दोनही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. मराठा समाज हा पूर्वीचा कुणबी समाजच असल्याने निजाम काळातील पुरावे शोधण्याचे काम या समितीला देण्यात आले आहे.

जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा म्हणून ही समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पाच सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, एखाद्या समाजाची जात शोधणे हे सरकारचे काम नाही. ही समिती असांविधानिक असल्याचा दावा चौधरी यांनी या याचिकेद्वारे केला होता.

दरम्यान, न्यायालयाने बुधवारी (ता. ११) निकाल सुनावताना राज्य शासनाच्या या प्रक्रियेवर आक्षेप न दर्शविता शासनाला समिती स्थापन करण्याचे अधिकार असल्याचा निर्वाळा केला. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. भूपेश पाटील यांनी, तर राज्य शासनातर्फे महाधिवक्ता ॲड. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. ए. एम. देशपांडे यांनी सहकार्य केले.

उच्च न्यायालयाचे निरीक्षण...

- जात प्रमाणपत्र देण्‍यापूर्वी उपलब्ध दस्तऐवजांचा विचार आवश्‍यक

- कुणबी समाजाशी संबंधित जुन्या नोंदी तपासण्याची पद्धत, पद्धत सुचविण्याचे काम समितीकडे

- समिती स्थापण्याचा उद्देश हा केवळ कागदपत्रांची तपासणी करण्‍याच्‍या पद्धतीतील सुसूत्रते‍साठी

- जात प्रमाणपत्र देण्‍यापूर्वी आवश्‍यक प्रक्रियेसाठी ही उपाययोजना

- हे कार्य सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे आढळत नाही

- समिती स्थापण्याच्या निर्णयात न्यायालयाने हस्तक्षेप करावा, असे काहीही नाही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT