Maratha reservation : अंतरवाली सराटीत १४ आक्टोबर रोजी राज्यस्तरीय मराठा मेळावा

Manoj jarange News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीस संदर्भात संवाद व्हावा यासाठी 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी (ता.अंबड जि.जालना) येथे राज्यस्तरीय मराठा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, ही माहिती मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
Maratha Reservation
Maratha Reservation Agrowon
Published on
Updated on

Jalna news : ‘‘येत्या १४ आक्टोबरला अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे राज्यस्तरीय मराठा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे,’’ असे मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बुधवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत सांगितले.

Maratha Reservation
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आमरण उपोषण मागे, पण आंदोलन कायम

संवाद साधणे, शांततेत आंदोलन करणे आदी चर्चा नागरिकांसोबत व्हावी. राज्यात ३० सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान जनतेशी संवाद साधणे, आढावा घेणे, नागरिकांना शांततेचे आवाहन करणे, आरक्षण जनजागृती करण्यासाठी राज्याचा दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्याची सुरवात अंतरवाली सराटी येथून ३० सप्टेंबर पासून करण्यात येणार आहे. अंबड, घनसावंगी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, कळमनुरी, उमरखेड, परळी, अहमदपूर, धाराशिव, सोलापूर, नगर, नाशिक आदी ठिकाणी जरांगे-पाटील व सहकारी भेटी देणार आहेत.

दरम्यान, मेळाव्यासाठी १०० एकर जमिनीवर मंडप, पार्किंग आदी व्यवस्था केली आहे. मेळाव्यात समाजाला तीस दिवसांच्या मुदतीमध्ये शासनाने काय निर्णय घेतले, समितीने काय काम केले, शासन स्तरावर कोणते अध्यादेश निघाले, याची माहिती देऊन जर आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर पुढे काय भूमिका घ्यायची या बाबत चर्चा करण्यात येणार आहे.

‘‘शासनाकडे पुरावे आहेत, नोंदी आहेत, मग आरक्षण देण्यासाठी काय अडचण आहे,’’ असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. ‘‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, यासाठी २००४ च्या शासकीय अध्यादेशात दुरुस्ती करा. सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, यासाठी वेगळा प्रवर्ग तयार करावा. काही नेते हे आरक्षण मान्य नाही, असे सांगतात. विरोध करणे चुकीचे आहे. ओबीसी, मराठा वाद निर्माण केला जात आहे. याला जनता बळी पडणार नाही. ओबीसीला धक्का लागणार नाही, वाद होऊ देऊ नका. आरक्षणाबाबत शासन व समिती काहीच माहिती देत नाही. संपर्क करत नाही, यांचे काय चालले हे कळत नाही,’’ अशी नाराजी श्री. जरांगे यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com