Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Water Project : विभागीय आयुक्तांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी

Water Supply Scheme : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी समांतर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली.

Team Agrowon

Chh. Sambhajinagr News : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी समांतर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. जॅकवेलचे काम अपूर्ण असल्याचे विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी अडचण जाणून घेतली. मजूर कमतरता व उंची वाढल्यामुळे मजूरांना काम करण्यास अडचण येत असल्याची बाबही निदर्शनास आली.

याबाबत मजुरांची संख्या वाढवणे, २०० एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक भाग प्रथम पूर्ण करणे, २७ मीटर पैकी २४ मीटर पूर्ण असून, उर्वरित ३ मीटर प्राधान्याने पूर्ण करणे, जॅकवेलच्या तिन्ही बाजूंनी माती भरून घेऊन ग्राउंड लेवलपर्यंत भरण्याचे निर्देश दिले. जॅकवेलच्या तिन्ही बाजूंनी माती भरण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भात तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ती निश्‍चित करण्याबाबतचा निर्णय झाला.

ॲप्रोच पुलाबाबतचे १८ मीटरचे काम बाकी असून, ते एक महिन्यात पूर्ण करा व १२०० मीमी पाइपलाइनसाठी चेअर लवकरात लवकर टाका अशा उपाययोजना या वेळी सुचविण्यात आल्या. बटरफ्लाय वॉल्व्ह बसविण्यात असलेल्या अडचणींचा आढावा घेतला.विशेष काळजी घेऊन जेथे बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविणे शक्य आहे तेथे तेथे बसविणे व इतर ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय स्वीकारून बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले. ३ दिवसांच्या शटडाऊन काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदार यांनी सर्व ठिकाणचे सुक्ष्म नियोजन करून काम पूर्ण करावे.

पुन्हा पुन्हा शटडाउन देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे सूक्ष्म आणि पक्के नियोजन करून काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने तातडीने या पुलाचे कामकाज पूर्ण करावे अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिल्या. हायड्रो टेस्टिंग पुढील ४५ दिवसांत पूर्ण करा असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिले. एकूण ९५ एअर व्हॉल्व्ह बसवावयाचे आहेत.

यापैकी ५६ एअर व्हॉल्व्हचे स्टेम उभे केले आहेत. उर्वरित ३९ व्हॉल्व्हचे काम अद्याप सुरू नाही ते तातडीने बसवा अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. एकूण ८ स्कोअर व्हॉल्व्ह बसाववायचे आहेत. त्यांचे काम अद्याप सुरू नाही, ते सुरू करण्याचे निर्देश दिले. मूळ आराखड्यात ५३ ईएसआरचा समावेश होता, तद्‍नंतर यापैकी ३ टाक्या रद्द करण्यात आल्या आहेत. उर्वरित ५० टाक्यापैकी ७ महानगरपालिकेला वर्ग केल्या असून, १० टाक्यांचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. एकूण ५० टाक्यांपैकी ४३ टाक्यांचे काम विविध टप्प्यांवर सुरू असून ते पूर्ण करा.

या वेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधीक्षक अभियंता दीपक कोळी, कार्यकारी अभियंता किरण पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक सिद्धार्थ मेश्राम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) अन्नपूर्णा सिंह, नगर परिषद प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय केदार, जायकवाडी जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव, जीव्हीपीआर चे जी. महेंद्र, श्री. खलिल उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT