Water Conservation Project : पाणी शेतातच मुरवणारा ‘जलतारा’

Jaltara Water Project : वाटुर (जि. जालना) येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी पाच वर्षांपूर्वी जलतारा नावाने पावसाचे पाणी जमिनीतच मुरवणारा शोषखड्डा कार्यक्रम सुरू केला. मित्र, ग्रामस्थ, संस्था या सर्वांचे हात कार्यक्रमास जोडले गेले.
Jaltara Water Conservation Project
Jaltara Water Conservation Project Agrowon
Published on
Updated on

Sustainable Agriculture : वाटुर (ता परतूर, जि.जालना) येथील डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात अनेक वर्षे पोलिटिकल सायन्स’ विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. त्यांची ५० शेती आहे. शेतीची प्रचंड आवड असताना स्वतःच्या शेतीची प्रगती करण्याबरोबर आपल्या तालुक्यातील दुष्काळी गावे, शेतकरी यांचाही विकास व्हावा यासाठी त्यांची धडपड होती. सन २००६ मध्ये श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेशी ते जोडले गेले.

संस्थेच्या जलजागृती अभियानाच्या माध्यमातून मंठा, परतूर तालुक्यातील अनेक गावांत ओढे, नाले, नद्या खोली- रुंदीकरणाची विविध कामे झाली. त्यात वायाळ यांचा मुख्य सहभाग होता. उल्लेखनीय सांगायचे तर २०१७ मध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून दहा गावांतील तरुणांना प्रशिक्षणाचा लाभ, त्यानंतर माळरानावर जाऊन १२ तास श्रमदान, त्यातून ८५ किलोमीटरवर सीसीटी, डीप सीसीटी, दगडी बांध, गॅबियन बंधारा, वृक्षारोपण कंपार्टमेंट बंडिंग, ओढ्या-नाल्यांचे खोलीकरण, नांगरतास नदीचे पुनरुज्जीवन आदी कामे झाली. त्यातून ही गावे पाणीदार झाली.

दुष्काळमुक्तीचा ध्यास

शेतकऱ्यांच्या शेतीतील समस्येचे मूळ कारण पाणीटंचाई किंवा दुष्काळ हे आहे. राज्यातील एकूण ४४ हजार गावांपैकी तब्बल २८ हजार गावांना जलसंकटाचा सामना करावा लागतो आहे. खरिपातील पीक जेमतेम घेतले की रब्बीत आकाशाकडे पाहण्याची वेळ या गावांवर येते. शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक समृद्धी व्हायची असेल तर पाण्याची शाश्‍वती मिळवणे गरजेचे आहे.

त्यासाठी पावसाचे पडणारे मात्र शेतातून वाया जाणारे पाणी शोषखड्ड्यांच्या माध्यमातून अडविले पाहिजे या विचारापर्यंत वायाळ आले. त्यातून २०२० मध्ये जलतारा हा कार्यक्रम सुरू केला. शेतातील पाण्याचे पुनर्भरण करण्याची ही संकल्पना होती. जुलै २०२४ ला स्वेच्छानिवृत्ती घेऊन वायाळ यांनी पूर्णवेळ या कामाला वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

Jaltara Water Conservation Project
Jaltara Yojana : ‘जलतारा’ योजना ही लोकचळवळ व्हावी

संकल्पना अशी रुजली

जलतारा संकल्पना रुजण्यात मदत झाली ती अमेरिकेत २७ वर्षांपासून वास्तव्यास असलेले व फेसबुकच्या माध्यमातून मित्र झालेले मनू निंबोधरी यांची. ते थेट वाटूरला आले. तेथे तब्बल १५ दिवस वास्तव्य केले. जलसंकट दूर करण्यासाठी सर्व गावांना वापरण्याजोगे, सहज सोपे, कमी खर्चिक असे तंत्रज्ञान असेल यावर दोघा मित्रांचे एकमत झाले. त्यातूनच शोषखड्डा तंत्राची कल्पना पुढे आली होती. अर्थात, वायाळ यांनी स्वतःच्या ५० एकरांत या तंत्राचा पहिला प्रयोग करण्याचे ठरवले.

Jaltara Water Conservation Project
Jaltara Yojana : वाशीम जिल्ह्यात ‘जलतारा’ कामांना गती

त्यानुसार ५० एकरांत ५० शोषखड्डे उभारले. हे तंत्रज्ञान सांगायचे तर पावसाचे पाणी जमिनीच्या उताराच्या भागात साठते. याच उताराला ४ बाय ४ फूट लांबी-रुंदी व सुमारे ६ फूट खोल असा खड्डा घेण्यात येतो. त्यात सुरुवातीला मोठे दगड, त्यानंतर थोडे मध्यम आणि सर्वांत वरती लहान गिट्टी व वाळू भरण्यात येऊन खड्डा बुजवण्यात येतो. या माध्यमातून पाणी झिरपत भूगर्भात साठत जाते.

पावसाळ्यापूर्वी एप्रिलमध्ये केलेल्या शोषखड्ड्यांच्या कामांमुळे पुढे शेतीतील ना पाणी वाहिले, ना माती. पहिल्या पावसातच ज्या विहिरीला डिसेंबरमध्ये आटण्याची सवय होती ती अर्धी भरली. दुसऱ्या पावसात ती तुडुंब भरली. झाली. ओढ्याकाठची जी १५ एकर जमीन पावसामुळे चिभडून जायची ती पहिल्याच वर्षी उपजाऊ झाली. त्यामध्ये मोसंबी बाग उभी केली.

डॉ पुरुषोत्तम वायाळ ९४२३४५८९८३

चार वर्षांत झालेली कामे दृष्टिक्षेपात

वायाळ यांनी शोषखड्डे खोदण्याचा हा प्रयोग पुढे पळसखेडा, मेसखेडा, जाटखेडा, पिंपरखेडा या चार गावांमध्ये विस्तारला. डिसेंबरमध्येच या गावांमध्ये टँकर सुरू व्हायचे. आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच अमेरिकेतील मित्र व अन्य मदत यांच्या निधीमधून गावे विस्तारित गेली.

२०२१- चार गावे

२०२२- ५० गावे

२०२३- ८४ गावे

२०२४- २५ गावे

आतापर्यंत चार वर्षांत १८१ गावांमध्ये

सुमारे १८१ गावात ८६ हजार ५०० शोष खड्ड्यांची निर्मिती झाली आहे. वायाळ सांगतात, की एक शोषखड्डा तयार करण्यासाठी पाचशे ते एक हजार रुपये खर्च येतो. यात जेसीबी यंत्र, दगड, स्वयंसेवक अशी रचना आहे. शोषखड्ड्याची दरवर्षी दुरुस्ती करायची झाल्यास त्यास फार कालावधीही लागत नाही.

शोषखड्ड्यांचे होणारे फायदे

भूजल पातळीत वाढ झाली. मातीत ओलावा तयार होतो.

अति पाऊस झाल्यास पाणी साठून न राहाता त्याचा निचरा होतो.

रब्बीत पाण्याची शाश्‍वती तयार होऊन वेळेवर पेरण्या होण्यास मदत होते.

पाण्याची शाश्‍वती मिळते.

कमी खर्चात तंत्रज्ञानाचा वापर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com