Collector Varsha Thakur-Ghuge  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : पेरणीसाठी जिल्हाधिकारी ठाकूर शेतकऱ्यांच्या बांधावर

Collector Varsha Thakur-Ghuge : लातूर जिल्ह्यात यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरू केली आहे.

Team Agrowon

Latur News : लातूर जिल्ह्यात यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ सुरू केली आहे. पावसाने उघडीप देताच सुरू केलेल्या पेरण्यांची पाहणी गुरुवारी (ता. १३) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी बांधावर जाऊन केली.

या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत बियाणांची उपलब्धता, खतांचा वापर, पेरणी पद्धती माहिती घेत स्वतः टोकन यंत्र हाती घेऊन पेरणीचा अनुभवही घेतला. बैलाच्या साहाय्याने होत असलेल्या पारंपरिक पेरणीत त्यांनी चाड्यावर मुठ धरली.

औसा तालुक्यातील लामजना, तांबरवाडी, खारोसा या गावांना भेट देऊन ठाकूर यांनी कृषी विभागाच्या पेरणीपद्धती विषयी सुरू असलेल्या जनजागृती अभियानातही सहभाग दिला. पेरणी प्रसंगी शेतकऱ्यांकडून बीजप्रक्रिया व आधुनिक पद्धतीने पेरणी होत असल्याबद्दल ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले.

प्रारंभी लामजना येथील केशव शिवहार पाटील यांच्या शेतामध्ये ठाकूर यांनी पेरणीची माहिती घेतली. तांबरवाडी येथील खंडू सूर्यवंशी यांच्याकडून टोकण यंत्राच्या साह्याने पेरणीचे फायदे त्यांनी जाणून घेतले.

या वेळी औसा - रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT