Paddy Sowing : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १७३२ हेक्टरवर भात पेरण्या पूर्ण

Sowing Update : गतवर्षीच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ५८ हजार हेक्टर आहे. त्यातील दहा टक्के क्षेत्रावर म्हणजेच सहा हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात येणार आहे.
Paddy Sowing
Paddy SowingAgrowon

Ratnagiri News : जूनच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात सरासरी १६३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गतवर्षीच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ५८ हजार हेक्टर आहे. त्यातील दहा टक्के क्षेत्रावर म्हणजेच सहा हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात तयारी सुरू झाली असून आतापर्यंत १ हजार ७३२ हेक्टरवर भात रोपवाटिकेसाठी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. अधिकारी कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन दुकानात उपलब्ध बियाणे व खते याची माहीत घेत आहेत. दर आणि उपलब्ध माल याची माहिती दुकानांबाहेर फलकावर लावण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. बियाणे व खतांची विक्री योग्य किमतीत होते आहे की नाही याची खात्री केली जात आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन केली आहेत.

Paddy Sowing
Cotton Sowing: सघन कापूस लागवडीचे तंत्र

शेतीसाठी जिल्ह्याला युरिया ५ हजार टन, एनपीके २५०० टन, एसएसपी ३५२ टन एवढे खत उपलब्ध आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्यासह अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील रेल्वे रेक केंद्राला भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी ५५०० क्विंटल बियाणे मागणी करण्यात आले होते.

Paddy Sowing
Paddy Sowing : ‘शिराळा पश्चिमोत्तर’मध्ये भात पेरणीची लगबग

आतापर्यंत ४२०० क्विंटल पुरवठा झाला आहे. बियाणे मुबलक प्रमाणात प्राप्त झाले असून शेतकऱ्यांना बांधावर भात बियाणे वितरित करण्यात आले आहे. युरियाची टंचाई भासू नये म्हणून महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळामार्फत ७६० टन युरिया बफर साठा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरीही अपेक्षित जोर नाही. मात्र भात पेरणीसाठा झालेला पाऊस पुरेसा असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यानुसार पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर पाणी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी प्रतीक्षा केली जात आहे. गतवर्षी महसूल विभागाकडून झालेल्या ऑनलाइन पीक नोंदीनुसार भात लागवडीखालील क्षेत्र ५८ हजार इतकेच नोंदले गेले आहे. जिल्ह्यात पूर्वी ६७ हजार हेक्टरवर भात लागवड होत होती. दहा हजार हेक्टरने क्षेत्रात गतवर्षी घट झाली होती. त्यामुळे यंदा भात क्षेत्र कमी झाले आहे.

भात सरासरी क्षेत्र ५८००० हेक्टर

नाचणी सरासरी क्षेत्र ७००० हेक्टर

भात रोपवाटिकेसाठी तयार क्षेत्र १७३२.२० हेक्टर

नाचणी रोपवाटिका ७४.६० हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com