Weather Update agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Weather Update : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast : उत्तर भारतामध्ये सकाळी दाट धुकेही आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या या थंड वाऱ्यांमुळे राज्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात किमान तापमानात घट झाली आहे.

sandeep Shirguppe

Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे काही दिवस थंडीचा जोर वाढणार आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी शेकोटी पेटल्या आहेत. पुढील ५ दिवस थंडीचा जोर राहणार असल्याचे कोल्हापूर वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. कोकण, कोल्हापूर भागात रब्बी हंगामातील विविध शेती कामात शेतकरी व्यस्थ झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी नाचणी पिकाची वेचणी सुरू आहे तर अंतीम टप्प्यात आलेल्या भात पिकाची काढणी सुरू आहे. शिरोळ, हातकणंगले भागात थंडीचा जोर वाढल्याने गहू पेरणीस पोषक वातावरण झाले आहे. यामुळे शेतकरी गहू पेरणीच्या लगबगीला लागला आहे.

हिमालयासह उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप सक्रिय आहे. त्यामुळे हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. पंजाब, हरियाणासह दिल्ली परिसरात थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारतामध्ये सकाळी दाट धुकेही आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या या थंड वाऱ्यांमुळे राज्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात किमान तापमानात घट झाली आहे. येत्या २६ नोव्हेंबरनंतर थंडीतील सातत्य जैसे थे राहण्याचा अंदाज आहे. तरी त्या दरम्यान बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राची शक्यता आहे.

तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर, मुंबई परभणी, नागपूर या नऊ जिल्ह्यांत चार दिवसांत म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान थंडीला काहीसा विराम मिळू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT