Kolhapur Weather Update agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Weather Update : कोल्हापुरात थंडीचा जोर वाढला; आणखी जोर वाढणार, कोकणात थंडीची प्रतिक्षाच

Maharashtra Winter Season : उत्तर भारतामध्ये सकाळी दाट धुकेही आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Winter : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ४ दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने थंडी आणखी किती दिवस लांबणार अशी चिन्हे होती. दरम्यान मागच्या २४ तासांपासून अचानक तापमानात घट होऊन रात्री थंडी आणि सकाळी धुके पडणे असे वातावरण आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून आल्या. पुढील दोन दिवसांत तापमान आणखी घटण्याची शक्यता कोल्हापूर वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हिमालयासह उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप सक्रिय आहे. त्यामुळे हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. पंजाब, हरियाणासह दिल्ली परिसरात थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारतामध्ये सकाळी दाट धुकेही आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे.

कोल्हापूरच्या हवामानात मागच्या दोन दिवसांत बदल होत आहे. दिवसभरात कमाल तापमान ३०, तर किमान तापमानाची १९ अंश सेल्सियस अशी नोंद झाली. सायंकाळनंतर हवामानात बदल होऊन गार वारे वाहू लागले आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास थंडीचा जोर वाढला. पश्चिम महाराष्ट्रात उत्तरेच्या बाजूचे वारे सक्रिय होणार असून, त्याने तापमानाचा पारा आणखी घसरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज

राज्यातील किमान तापमानात घट होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज भूगोल व पर्यावरण अभ्यासक डॉ. युवराज मोटे यांनी व्यक्त केला. मंगळवार(ता.१९) पासून २३ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा जोर असेल.

कोकणपट्ट्यात अपेक्षित थंडी कधी ?

सिंधुदूर्ग जिल्ह्यात आंबा, काजू बागायतदार चांगल्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही थंडी नेमकी कधी पडेल ? असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात वाऱ्याचा वेग अधिक आहे. दोन-तीन दिवस असलेले ढगाळ वातावरण देखील निवळले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोनच दिवस हलकी थंडी झाली होती. त्यानंतर पहाटे पुन्हा हलक्या थंडीची झलक पाहायला मिळत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उर्वरित भातपीक कापणीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. नाचणी पिक वेचणीला देखील शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मका भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत गहू दर

Maharashtra Election 2024 : पश्चिम विदर्भात अटीतटीच्या लढती

Cotton Crop : अपेक्षाभंग झाल्याने उखडून टाकली कपाशी

Maharashtra Hawaman Andaj : राज्यात थंडी वाढणार; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात मोठी घट 

Farmers in Konkan : कोकणातील शेतकऱ्यांची रब्बीची लगबग सुरू; भातशेती कामे अंतीम टप्प्यात

SCROLL FOR NEXT