Maharashtra Weather Update agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Weather Update : राज्यातील थंडीचा प्रभाव होणार कमी, काश्मीर खोऱ्यात मात्र थंडीची तीव्र लाट

Weather Update : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यातून थंडी पळाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

sandeep Shirguppe

Maharashtra Cold Wave : देशातील उत्तरेच्या भागात मागच्या ८ दिवसांपासून जोरदार थंडीची लाट आली आहे. दरम्यान सर्वाधिक काश्मीर खोऱ्याला थंडीच्या तीव्र लाटेने घेतले असून अनेक भागात किमान तापमान शुन्य अंशाच्या आता गेले आहे तर काही ठिकाणी तीन अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे.

श्रीनगरमध्ये किमान तापमानात बुधवारी (ता. २७) रात्री आणखी घसरण होऊन ते उणे ३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. मंगळवारी ते उणे २.६ अंश सेल्सिअस होते.

देशभरात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीबरोबरच दाट धुकेही पसरले आहे. त्यामुळे दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाल्याने वाहतूक विभागाने वाहनचालकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

धुक्यामुळे श्रीनगरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांच्या उड्डाणावर कोणताही परिणाम झाला नाही. परंतु, दिल्लीसह उत्तर भारतातून श्रीनगरमध्ये येणाऱ्या विमानांना खराब हवामानामुळे उशीर झाल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली.

राज्यात किमान तापमान वाढले

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यातून थंडी पळाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नगर येथे ११.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते ५ अंश सेल्सिअसने वाढले असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले.

थंड वाऱ्याचा प्रवाह कमी

उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, गुरुवारी (ता. २८) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंडमधील अनेक भागांत किमान तापमान ८ ते १२ अंशांच्या दरम्यान होते. उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह काहीसे कमी झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे.

दिल्लीत १३४ विमानांची उड्डाणे रद्द

दिल्लीलाही थंडीच्या तीव्र लाटेने आपल्या कवेत घेतले आहे. थंडीबरोबर दाट धुक्याचा विमान व रेल्वेसेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दिल्लीत येणाऱ्या व जाणाऱ्या अशा एकूण १३४ विमानांना उशीर झाला. त्यात ३५ आंतरराष्ट्रीय विमानांचाही समावेश होता. त्याचप्रमाणे, देशांतर्गत ४३ विमानांच्या उड्डाणांना व २८ विमानांना उतरण्यासही उशीर झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT