Hydro Electric Power Generation Project : ‘पाटगाव’मधून अदानींच्या प्रकल्पास पाणी देण्यास स्‍थगिती

Kolhapur News : भुदरगड तालुक्यातील नागरिकांचा प्रकल्पास तीव्र विरोध
Hydro Electric Power Generation Project
Hydro Electric Power Generation Project Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Gautam Adani : कोल्हापूर ः पाटगाव (जि. कोल्‍हापूर) येथील धरणाचे पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पास देण्‍यास वन विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे.

गेल्‍या आठवड्यापूर्वी भुदरगड तालुक्यात मोठे जनआंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनामुळे सरकारला एक पाऊल मागे घेत स्थगिती द्यावी लागली. या बाबतचे पत्र कोल्हापूर वन विभागाने प्रसिद्धीस दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातील पाणी देण्याचे नियोजित होते. यावर भुदरगड तालुक्यातील अनेक गावांनी विरोध केला.

Hydro Electric Power Generation Project
Kolhapur Patgaon Dam : गौतम अदानींचे मनसुबे कोल्हापूरकरांनी उधळले, पाटगाव धरणातील पाणी देण्यास स्थगिती

आठ दिवसांपूर्वी पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले होते. वनविभागाने घालून दिलेल्या अटींच्या विरोधात पाटगाव येथे अदानी ग्रुपकडून काम सुरू आहे.

वनक्षेत्रात अनधिकृत वृक्षतोड व रस्ता तयार केला आहे. या कंपनीवर वनविभाग कायद्याने गुन्हा दाखल करावा. तेथील मशिनरी जप्त करावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या मागणीचे निवेदन वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना देण्यात आले होते. वनविभागाने ताबडतोब काम थांबवावे.

अन्यथा आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका घेण्यात आली. या वेळी तातडीने वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आमच्या समक्ष हे काम बंद करावे व मशिनरी तिथून हलवावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. या वेळी लोकप्रतिनिधी, आंदोलक, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन काम बंद केले होते. वाढत्या जनक्षोभाची तीव्रता लक्षात घेऊन वनविभागाने हे आदेश दिले.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी या स्थगितीचे स्वागत केले आहे. येथून पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत धरणांतील पाणी देऊ देणार नाही, असे आबिटकर यांनी सांगितले.

‘कोणतेही काम न होण्याची दक्षता घ्या’
अदानींच्या प्रकल्पास तालुक्यातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. यामध्ये लोकभावना तीव्र असल्याने हा प्रकल्प इतरत्र उभारावा, प्रकल्पास दिलेली संयुक्त सर्वेक्षणाची परवानगी रद्द करावी, अशी मागणी करण्यात येत होती.

या जागेवरील साहित्य तत्काळ हलवावे. या जागेवर कोणतेही काम होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्र कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com