Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election 2024 : द्यायला पैसे नाहीत, तर तीन हजार कोठून आणणार?

Eknath Shinde : कर्नाटक आणि छत्तीसगड प्रमाणे निवडणुकीत घोषणा करायच्या आणि नंतर शक्य नाही म्हणायचे असे विरोधकांचे महाराष्ट्रात सुद्धा चालू असल्याची टीकाही त्यांनी केली.

Team Agrowon

Akola News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली. तिला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी नागपूर कोर्टात गेले आहेत. एकीकडे राज्याकडे पैसे नाही म्हणायचे आणि दुसरीकडे राहुल गांधींनी स्वतः सभेत महिलांना तीन हजार रुपये देऊ असे म्हटले.

मग जर १५०० द्यायला पैसे नाहीत तर तीन हजार कोठून देणार, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला केला. कर्नाटक आणि छत्तीसगड प्रमाणे निवडणुकीत घोषणा करायच्या आणि नंतर शक्य नाही म्हणायचे असे विरोधकांचे महाराष्ट्रात सुद्धा चालू असल्याची टीकाही त्यांनी केली.

जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. ७) प्रचारसभेत ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले, काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत असूनही उठाव केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारे सरकार राज्यात आणले.

गेल्या अडीच वर्षात समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे, जलयुक्त शिवार योजना अशा अनेक लोकोपयोगी योजना फक्त बंद करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. तर दोन वर्षात सर्व प्रकल्प पुन्हा सुरू करून राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे काम आम्ही केले. दोन वर्षात तब्बल १२४ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. शेतकरी सन्मान योजनेतून १२ हजारांची मदत केली. एक रुपयात पीकविमा योजना दिली. सततच्या नुकसानीला देखील भरपाई महायुती सरकारने दिली.

...तर लिंबू संशोधन केंद्र देऊ

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव भागात लिंबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या ठिकाणी लिंबू पिकावरील संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी आपल्याकडे झाल्याचे सांगत शिंदे यांनी आमचे सरकार पुन्हा आल्यावर इथे नक्की लिंबू पिकावरील संशोधन केंद्र सुरू करू, असे जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT