CM Devendra Fadanvis Visits Beed : मागच्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आले आहेत. खुंटेफळ धरणाच्या बोगद्याच्या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पामुळे १.६८ टीएमसी पाणी येथील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यावेळी आमदार सुरेश धस, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी सुरेश धस म्हणाले की, "सन २००५-०६ पासून ही योजना माझ्या डोक्यात होती. या प्रकल्पामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास २७ हजार ५०० हेक्टर जमीनीला पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचेमुळे मला अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत". अशी माहिती आमदार धस यांनी दिली.
धस पुढे म्हणाले "साहेब आपण आष्टी तालुक्यातील योनजेसाठी ३०० कोटी रुपये दिले. तुम्ही मला सभागृहात सांगितले सुरेश धस तुम्हाला ३०० कोटी रुपये देतो आणि तुम्ही लगेच देऊन पण टाकले. या प्रकल्पामुळे बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील ५ तालुक्याची पाण्याची गरज भागणार आहे. फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. आता फक्त ३.२७ टी.एम.सी. पाणी मंजूर करून द्या, म्हणजे काम होईल. यापुढे मी राहीन किंवा न राहीन पण या मतदार संघात भाजपचाच आमदार असेल" असे सुरेश धस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आष्टीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सुरेश धस म्हणाले की, आम्हाला केवळ फडणवीसांकडून मदतीच्या अपेक्षा आहेत, दुसऱ्यांकडून नाहीत, असे विधान केले. मी बोललो की बीडची बदनामी होते, असा आरोप केला जातो, असेही धस यांनी म्हटले आहे. यावेळी मंच्यावर मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.