Micronutrient Fertilizers: भाजीपाल्यांची गुणवत्ता वाढवणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये विकसित

Agriculture Technology: भाजीपाला पिकामधील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतांमुळे केवळ उत्पादनात घट होते असे नाही, तर ही उत्पादने सातत्याने आहारात घेत राहणाऱ्या व्यक्तींनाही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon
Published on
Updated on

ICAR innovation: भाजीपाला पिकामधील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतांमुळे केवळ उत्पादनात घट होते असे नाही, तर ही उत्पादने सातत्याने आहारात घेत राहणाऱ्या व्यक्तींनाही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पाश्चिमात्यांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये शाकाहारी व्यक्तींचे प्रमाण अधिक असून, हे लोक विविध प्रकारच्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी प्रामुख्याने भाजीपाल्यावर अवलंबून असतात.

Vegetable Farming
Linking fertilizer and pesticide : लिंकिंग करणाऱ्या खत आणि किटकनाशक कंपन्यावर कारवाई करू; कृषिमंत्र्यांचा इशारा

भारतातील ग्रामीण भागामध्ये आढळणाऱ्या कुपोषणाच्या समस्येवर आणि भाजीपाल्यातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने दोन नावीन्यपूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त फॉर्म्युलेशन तयार केले आहेत. काकडीवर्गीय पिकांसाठी काशी सूक्ष्म शक्ती आणि शेंगावर्गीय भाजीपाल्यासाठी काशी सूक्ष्म शक्ती प्लस या दोन उत्पादनामुळे पिकांची उत्पादकता आणि गुणवत्तेमध्ये मोठी वाढ होणार आहे.

शेतकऱ्याच्या उत्पादकतेत वाढ

कैलहाट (मिर्झापूर) येथील प्रगतिशील शेतकरी नागेश कुमार सिंग यांनी २०२४ मध्ये कारले व भोपळा पिकांमध्ये काशी सूक्ष्म शक्ती या उत्पादनाचा वापर केला. त्यामुळे पिकाचा काढणी कालावधी १५ ते २० दिवसांनी लांबला, तर तीन ते चार अधिक तोडी मिळाल्या. परिणामी या ३० बिस्वा ( एक बिस्वा म्हणजे १२५.४२ वर्गमीटर) क्षेत्रातील पिकांमधून २५ ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळाले. कारले पिकातून २९ हजार रुपये, भोपळेवर्गीय पिकातून १७५०० आणि ४५००० रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले.

Vegetable Farming
Fertilizer Linking : शेतकऱ्यांना दुय्यम खत खरेदीची सक्ती नको

यासोबतच त्यांनी चवळी (३ बिस्वा) , सोयाबीन (१ बिस्वा) या सारख्या शेंगावर्गीय पिकांमध्ये काशी सूक्ष्म शक्ती प्लस या उत्पादनाचा वापर केला. त्यामुळे त्यांच्या तीन ते चार तोडी अधिक मिळून, उत्पादकतेमध्ये २० ते २५ टक्के वाढ मिळाली. चवळीतून १० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. सोयाबीन उत्पादन त्यांनी प्रामुख्याने घरगुती वापरासाठीच ठेवले. या दोन्ही उत्पादनाच्या वापरामुळे उत्पादनात व दर्जामध्ये चांगली वाढ मिळाल्याने नागेश कुमार सिंग समाधानी आहेत.

उत्पादने

काशी सूक्ष्म शक्ती हे भुकटी स्वरूपातील फॉरम्युलेशन काकडीवर्गीय पिके, कारले, भोपळ्याचे विविध प्रकार यासाठी उपयुक्त आहे. तर काशी सूक्ष्म शक्ती प्लस या खास शेंगावर्गीय भाजीपाला पिकांसाठी तयार केलेल्या या द्रवरूप उत्पादनामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके आणि गांडूळपाणी यांचा समावेश आहे. या उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणात चाचणी घेतल्यानंतर कार्यक्षमता सिद्ध झाल्यानंतरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहेत.

(स्रोत : आयसीएआर - भारतीय भाजीपाला संशोधन केंद्र, वाराणसी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com