
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : राज्याभरासह देशात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण तापलेलं आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनासह संसदेच्या अधिवेशनात देखील या विषय गाजला. याचप्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील आरोप केले होते. आता त्यांनी नवा आरोप करताना, पीकविमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट गेतल्यानंतर गौप्यस्फोट करताना ही मागणी केली आहे.
धस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, जिल्ह्यातील पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. जिल्ह्यात तब्बल सात हजार हेक्टरचा पीकविम्याचा घोटाळा झाला असून तो एकट्या बीड झाल्याचे धस यांनी म्हटले आहे. तसेच असाच घोटाळा धाराशिव जिल्ह्यातही झाला असून तो तीन हजार हेक्टरचा असल्याचा दावा ही धस यांनी केला आहे.
यावेळी धस यांनी सोनपेठ तालुक्यातील माहिती समोर आणताना येथे १३ हजार १९० एकर विमा भरण्यात आला. तो येथेली परळी तालुक्यातील सीएससी सेंटरमधून भरला गेला असून तालुक्यातील शेतकऱ्यांची लूट करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या योजनेचा गैस फायदा घेण्यात आल्याचा आरोप देखील धस यांनी केला आहे.
धस यांनी परळीत पीकविम्यात घोटाळा २०२३ मध्ये झाला असून तो महायुतीच्या काळात झाला आहे. तर तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका रूपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप धस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता तत्कालीन कृषिमंत्र्यांनी योजनेचा गैरफायदा घेतला, असे आपण म्हटलं आहे. बाकी कोण ते पत्रकारांनी शोधावं, असेही म्हटलं आहे.
तसेच धस यांनी या घोटाळाप्रकरणी पीकविम्याप्रकरणी कंपनीचे अधिकारी आणि लोक जबाबदार आहेत. तर यांचे थेट कनेक्शन तत्कालीन कृषिमंत्र्यांशी असावा. याबाबत पोलिसांत एक तक्रार दाखल झाली आहे. तर हे घोटाळे २२ सीएससी सेंटरमधून झाले आहेत. जे परळी तालुक्यातील आहेत. तर तीन हजार हेक्टरवरील जो पीकविमा भरला गेला आहे. तो धाराशिवमध्ये भरला गेला असून शेतकरी मात्र परळी तालुक्यातले आहेत. तर विमा हा महावितरणाच्या जमिनीवर देखील भरण्यात आल्याचे उघड झाल्याचे धस यांनी म्हटले आहे.
तर याबाबत देशाचे कृषिमंत्री शिवराज चौहान यांच्याकडे तक्रार करणार असून देशात अशा पद्धतीने परळी पॅटर्न पीकविमा राबवावा अशी मागणी करण्यार असल्याचे म्हटले आहे. तर पीकविम्यात झालेल्या हा घोटाळा संघटीत असून याबाबत पीकविमा कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळेचे पडसाद अख्या राज्यात उमटताना दिसत आहेत. देशमुख यांच्या हत्येनंतर व्हिडिओ कॉल करून 'आका'ला माहिती देण्यात आली होती. यामुळे याची एसआयटीमार्फत चौकशी व्हायला हवी. दोन दिवसांपूर्वी वाईन शॉपमध्ये जे 'आका' होते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या खरेदी केल्या क्या? याचाही तपास व्हायला हवा.
पोलिस अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र मांजरसुमा घाट असून तेथे ३० ते ३५ एकर शेती कुणाच्या नावावर आहे? त्यासाठी मुरूम कोठून उचलला? याचाही तपास व्हावा. 'आका'चे प्रस्थ वाढलं असून कार्यक्षेत्रही वाढत चालल्याचा आरोप देखील धस यांनी केला आहे. तर नक्की आका कोण याचे याचीही माहिती राज्याचे मुख्यमंत्री एसआयटी जाहीर केल्यानंतर तपासाअंती समोर येईल, यामुळे यावर अधिकचे बोलणे उचित नसल्याचे धस यांनी म्हटलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.