Cloudy Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : मूग मळणीत ढगाळ वातावरणाने व्यत्यय

Moong Crop : खानदेशात सतत पाऊस सुरू होता. मागील काही दिवसांपासून मुगाची मळणी सुरू आहे. परंतु त्यातही ढगाळ, आर्द्रतायुक्त वातावरणाने अडचणी येत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सतत पाऊस सुरू होता. मागील काही दिवसांपासून मुगाची मळणी सुरू आहे. परंतु त्यातही ढगाळ, आर्द्रतायुक्त वातावरणाने अडचणी येत आहेत. शेतकरी शेतातून शेंगा तोडून आणत असून, घरीच त्यावर मळणीची कार्यवाही करून घेत आहेत.

परंतु मळणीनंतरही दाण्यांत आर्द्रता राहत आहे. कारण कोरडे, निरभ्र वातावरण नाही. सकाळी काही तास कोरडे वातावरण असते. परंतु नंतर ढगाळ वातावरण राहते. मध्येच तुरळक पाऊसही काही भागात येतो.

यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, धावपळ करावी लागत आहे. मूग पीक मळणीवर येत असतानाही पाऊस सुरू होता. आता मागील काही दिवसांपासून मूग पिकात शेंगा तोडणीचे काम सुरू आहे. शेंगा तोडून त्या वाळविण्यासाठी निरभ्र वातावरण नाही. यामुळे शेंगा तोडून त्या घरगोठ्यात साठवाव्या लागत आहेत.

मुगाची पेरणी मागील हंगामात दुष्काळी स्थिती किंवा जूनमधील पावसाच्या खंडामुळे कमी झाली होती. यंदा पाऊस वेळेत आला. यामुळे पेरणी वेळेत किंवा बऱ्यापैकी झाली. खानदेशात कडधान्य पिकांत मुगाची पेरणी अधिक केली जात होती. पण अलीकडच्या वर्षांत मूग पेरणी घटली आहे. कारण मुगाचे कमी किंवा अतिपावसात नुकसान होत असल्याचा कटू अनुभव शेतकऱ्यांना आहे.

यामुळे पेरणी घटत आहे. यंदा खानदेशात सुमारे २२ हजार हेक्टरवर मूग पेरणी झाली होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरवर मूग पीक होते. जिल्ह्यात पूर्वी मुगाची पेरणी १८ ते २० हजार हेक्टरवर केली जात होती.

पण उत्पादन कमी येत असल्याने मूग पेरणी घटली आहे. मुगाची पेरणी खानदेशात बेवड म्हणून केळी उत्पादक करतात. ही पेरणी चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर व अन्य भागात केली जाते. काळ्या कसदार क्षेत्रांत मूग पेरणी केली जाते. शेतकरी शेंगा तोडून पिकाचे अवशेष जमिनीत गाडतात.

एकरी एक ते सव्वा क्विंटल उत्पादन...

यंदाही पाऊस व ढगाळ वातावरणात काढणी, मळणीची कामे शेतकरी उरकत आहेत. मुगाचे उत्पादन एकरी एक ते सव्वा क्विंटल एवढे येत आहे. काही शेतकऱ्यांना फक्त ६० ते ७० किलो मूग उत्पादन हाती येत आहे. कारण सततच्या पावसाने फुले, शेंगा कमी लागल्या आहेत. ऐन वाढीच्या काळात पिकात फवारणी, तणनियंत्रणाचे काम पावसाने करता आले नाही. याचाही फटका बसला आहे. तर आता मळणीच्या काळातही पाऊस येत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT