Climate Change  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Climate Change : मृग बहरातील फळ पिकांसाठीचे हवामान धोके

विनयकुमार आवटे

Mrig Bahar 2024 : मृग बहर २०२४ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू , लिंबू, सीताफळ, द्राक्ष या फळपिकांसाठी विमा योजना लागू केली आहे. यात विविध हवामान घटकांनुसार हवामान धोके निर्धारित केले असून, त्यानुसार नुकसान भरपाई देय होते. त्यामुळे हे हवामान धोके समजून घेणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे.

भाग २

डाळिंब : एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर १,६०,००० रुपये

हवामान धोका व कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हेक्टर)

१) पावसाचा खंड

ता. १५ जुलै ते १५ ऑगस्ट १) या कालावधीमध्ये सलग पावसाचा खंड २० दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम ७,२६२ रुपये देय होईल.

२) या कालावधीमध्ये सलग पावसाचा खंड २१ ते २५ दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम १४,५२३ रुपये देय होईल.

३) या कालावधीमध्ये सलग पावसाचा खंड २५ दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम २१,७८४ रुपये देय राहील.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम २१,७८४ रुपये)

(२.५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.)

२) पावसाचा खंड

ता. १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर १) या कालावधीमध्ये सलग पावसाचा खंड २० दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम २१,१६९ रुपये देय राहील.

२) या कालावधीमध्ये सलग पावसाचा खंड २१ ते २५ दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम ३५,६९२ रुपये देय राहील.

३) या कालावधीमध्ये सलग पावसाचा खंड २५ दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम ५०,८३० रुपये देय राहील.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम ५०,८३० रुपये)

(२.५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.)

३) जास्त पाऊस

ता. १६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर १) या कालावधीमध्ये एका दिवसात ४५ मि. मी. ते ६० मि. मी. पाऊस पडल्यास नुकसान भरपाई रक्कम १४,५२३ रुपये देय राहील.

२) या कालावधीमध्ये एका दिवसात ६० मि.मी.पेक्षा जास्त, परंतु ९० मि.मी.पेक्षा कमी पाऊस पडल्यास नुकसान भरपाई रक्कम ३५,६९२ रुपये देय राहील.

३) या कालावधीमध्ये एका दिवसात ९० मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस पडल्यास नुकसान भरपाई रक्कम ८७,३८६ रुपये देय राहील.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम ८७,३८६ रुपये)

सीताफळ : एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर रु. ७०,००० रुपये

हवामान धोके व कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति / हेक्टर)

१) पावसाचा खंड

ता. १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर १) या कालावधीमध्ये सलग १५ दिवसांचा पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम १२,६०० रुपये देय होईल.

२) या कालावधीमध्ये सलग २० दिवसांचा पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम २१,००० रुपये देय होईल.

३) या कालावधीमध्ये सलग २५ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम ४२,००० रुपये देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम ४२,००० रुपये)

२) जास्त पाऊस

ता. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर १) या कालावधीमध्ये १ दिवस ४० मि.मी. पाऊस झाल्यास रक्कम ११,२०० रुपये नुकसान भरपाई देय होईल.

२) या कालावधीमध्ये सलग २ दिवस प्रतिदिन ४० मि.मी. पाऊस झाल्यास रक्कम २८,००० रुपये नुकसान भरपाई देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम २८,००० रुपये)

द्राक्ष : एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर ३,८०,००० रुपये

हवामान धोका व कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रुपये)

१) पाऊस, आर्द्रता व किमान तापमान

ता. १५ जून ते १० जुलै १) या कालावधीत सलग ३ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास नुकसान भरपाई रक्कम ३०,४०० रुपये देय राहील.

२) या कालावधीत सलग ४ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास नुकसान भरपाई रक्कम ७६,००० रुपये देय राहील.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम ७६,००० रुपये)

२) पाऊस, आर्द्रता व किमान तापमान

ता. ११ जुलै ते ३० ऑगस्ट १) या कालावधीत सलग ४ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास नुकसान भरपाई रक्कम ४५,६०० रुपये देय राहील.

२) या कालावधीत सलग ५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास नुकसान भरपाई रक्कम १,१४,००० रुपये देय राहील.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम १,१४,००० रुपये)

३) पाऊस, आर्द्रता व किमान तापमान

ता. १ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर

(घड तयार होण्याची अवस्था) १) या कालावधीत सलग ३ दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास नुकसान भरपाई रक्कम ७६,००० रुपये देय राहील.

२) या कालावधीत सलग ४ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस प्रतिदिन १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, आर्द्रता ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच किमान तापमान १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास नुकसान भरपाई रक्कम १,९०,००० रुपये देय राहील.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम १,९०,००० रुपये)

टीप : १) सदर नुकसान भरपाई शासनाच्या महावेध प्रकल्प अंतर्गत स्थापित स्वयंचलित हवामान केंद्रावरून प्राप्त होणाऱ्या हवामान नोंदीनुसार निश्‍चित केली जाते.

२) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

(लेखक कृषी आयुक्तालयामध्ये कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT